कार्ड आणि पाम्स संस्थेच्या माध्यमातून हिप्परगा थडी व सगरोळी सर्कलमध्ये समाजकार्याची बीजे रोवली आहे उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते संदीप एडकेवार यांच्या माध्यमातून संस्थेची स्थापना हिप्परगा थडी येथे करण्यात आली... (मारोती एडकेवार सगरोळी प्रतिनिधी सगरोळी:) सर्कल मध्ये हिप्परगा थडी या गावांमध्ये कार्ड आणि पाम्स संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याची बीजे रोवण्यात आली दिनांक 14 जुलै 2024 रोजी पाम्स व कार्ड संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि हिप्पारगा थडी तसेच केसराळी,रामपूर थडी,लगुळ, बडूर या पाच गावाचे नूतनीकरण करण्यासाठी या संस्थेने अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो गावातील पाण्याचे प्रश्न रोजगारांचे प्रश्न असो या सर्व गोष्टीचे प्रश्न जाणून घेण्यासाठी हा कॅम्प लावून या संस्थेची उभारणी करण्यात आलेली आहे तसेच पाच गावाचे सरपंच यांचे संस्थेमार्फत संस्थेचे सचिव माणिक पारदे यांनी भविष्यातील नियोजनाचा आढावा घेतला तसेच हिप्पारगा थडी चे सरपंच इनामदार रयबर बेग केसराळीचे सरपंच राजू पाटील व लघुळ चे सरपंच व रामपूर थडीचे सरपंच गणेश पाटील व बडूरचे सरपंच चेतना जाधव या मान्यवरांचा मानचिन्ह देऊन संस्थेच्या मार्फत सुरेश मिरजे तसेच हिप्परगा थडी येथील उच्चशिक्षित व समाजकार्यात उत्कृष्ट काम करणारे अजीम पटेल आणि डॉक्टर पूजा एडकेवार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या संस्थेच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनेक सामाजिक उपक्रम हे बिलोली तालुक्यातील अनेक गावात गावात राबवल्या जातील असे संस्थेचे सचिव व संस्था स्थापन कार्ड संदीप एडकेवार यांनी असे जाहीर केलेले आहे हिप्परगा थडी येथील गावातील सर्व प्रमुख पाहुणे आदरणीय पोलीस पाटील ग्रामपंचायत कार्यालयाचे सदस्य व्यंकट तुकडे,साहेबराव येडकेवार भगवान एडकेवार ग्रामपंचायत उपसरपंच मारुती एडकेवार हे सर्व गावातील अनेक प्रमुख पाहुणे उपस्थित होते

Previous Post Next Post