हिप्पारगा थडी येथे जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शाहू महाराजांची, जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. (मारोती एडकेवार सर्कल: प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी : बहुजनाचे राजे आरक्षणाचे जनक, छत्रपती शाहू महाराजांची जयंती जिल्हा परिषद शाळा हिप्पारगा थडी,येथे सामाजिक न्याय दिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमात राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या, सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला. आणि विद्यार्थ्यांना, त्यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली, कार्यक्रमाची सुरुवात,ज्येष्ठ शिक्षिका व सौ. देशपांडे मॅडम, यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर, उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सामाजिक,समता,बंधुता,आणि न्याय,या मुद्यावर आधारित सकल मार्गदर्शन केले. संजय गायकवाड सर,आणि बालाजी गेंदेवाड सर, यांनी आपले विचार मांडत. शाहू महाराजांनी समाजातील,मागास,वंचित आणि दुर्बल, घटकांना दिलेल्या संधी,त्यांच्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्व. आणि त्यांनी घडवलेले सामाजिक बदल.यावर प्रेरणादायी, मार्गदर्शन केले.यावेळी शाळेतील, विद्यार्थी कुमारी शेख मीराबी इमामसाब,व कीर्ती उत्तमराव धसाडे, या विद्यार्थिनी आत्मविश्वासपूर्वक आपले, मनोगत व्यक्त केले. त्यांनी सामाजिक न्यायाच्या मुद्यावर, आधारित विचार मांडून छत्रपती,शाहू महाराजाविषयी आदर,व प्रेरणा आपल्या शब्दातून प्रभावीपणे व्यक्त केले. सामाजिक न्याय दिवस, म्हणून हा कार्यक्रम प्रेरणादायी पद्धतीने पार पडला. यावेळी मुख्याध्यापक, तसेच अजय कोंडलवाडे सर,व सर्व शिक्षक वृंद यांची, सक्रिय उपस्थिती व सहभाग होता. सामाजिक न्याय दिवस म्हणून हा दिवस साजरा केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, बांधिलकी, संविधानातील,मूल्यांची जाणीव, व प्रेरणा, निर्माण करणारा ठरला.
byMEDIA POLICE TIME
-
0