प्रिन्स सीबीएसई स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी. सेलू : दि.६ रोजी एल. के. आर.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश सीबी एसई स्कूल मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे तर्फे घेण्यात आलेल्या स्कॉलरशिप परीक्षेत तनिष्का तेलभरे इयत्ता आठवीची विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादी (CBSE/ ICSC board ) मध्ये राज्यातून दुसरा क्रमांक मिळवला. यासाठी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. संजय रोडगे यांनी तनिष्का तेलभरे आणि तिच्या पालकांचा सत्कार केला. तसेच मुलांच्या सर्वांगीण विकासा साठी शिक्षकांनी "सुविधा देणारा" बनले पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन केले .तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सायंस ऑलिम्पियाड ( IMO, NSO, IEO, IGKO, NCO, ISSO) मध्ये इंटरनॅशनल रँक 1) - मिळवलेल्या प्रेरणा काष्टे, प्रज्वल रोडगे ( INR- 8), तेजश्री चौधरी ( INR- 9) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात पालक मोठ्या संख्येने सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
byMEDIA POLICE TIME
-
0