ढोरवासा केंद्रातील 14 शाळांत शिक्षण सप्ताह साजरा. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती चंद्रपूर )भद्रावती दि.7- राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या वर्धापन दिनानिमित्य भद्रावती तालुक्यातील ढोरवासा केंद्रांतर्गत दिनांक 22 ते 28 जुलै या कालावधीत शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले.यात केंद्रातील 14 शाळांनी सहभाग दर्शविला होता. या शिक्षण सप्ताह अंतर्गत कृतिशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षण न मिळता बाहेरच्या जगातील शिक्षण मिळून कौशल्य प्राप्ती व विद्यार्थी स्वावलंबी होण्यास मदत झाली. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता.ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश होता, अध्ययन- अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफ च्या दृष्टिकोनातून इको क्लब आणि समुदाय सहभाग दिवस असे नाविन्यपूर्ण व वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले.तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा श्री डॉ प्रकाशजी महाकाळकर आणि केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्य ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व तंत्रज्ञान विषयक उपक्रमाबरोबर लोकसहभागातुन शाळेत विविध नवोप्रकमाचे आयोजन केले.हा शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व 14 शाळेच्या मुख्याध्यापक, विद्यार्थी व शालेय व्यवस्थापन समिती यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0