*प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र द्या*""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""" *आज दि. १८ नोव्हेंबर रोजी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती शिष्टमंडळ यांनी मंत्रालय मुंबई येथे राजेश बागडे, उप-सचिव मदत व पुनर्वसन विभाग यांची भेट घेऊन सन २००६ ते २०१३ मधिल सरळ खरेदीधारक प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र दि. २९ जानेवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार बंद केले त्याविषयी सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले* *यावेळी मा. उप - सचिव राजेश बागडे साहेब यांनी शिष्टमंडळ यांना सांगितले की, याविषयी लवकरच निर्णय घेऊ असे सांगितले. यावेळी या शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष तथा विभागिय कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे समिती उपाध्यक्ष शिवदास पाटील ताठे, समिती पदाधिकारी महादेवराव निंबोकार, अशोकराव मगर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र जाधव इ. उपस्थित होते*
byMEDIA POLICE TIME
-
0