वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे- डॉ संजय रोडगे. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी )परभणी. एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल मध्ये पालक व विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण.सेलू : दि. ७ ऑगस्ट श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे वृक्षारोपण अभियान अंतर्गत विद्यार्थी व पालकांनी वृक्षारोपण केले.वृक्षा रोपण अभियान कार्यक्रम प्रसंगी कार्य क्रमाचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे,सचिव डॉ. सविता रोडगे,प्रशास कीय अधिकारी प्रा. महादेव साबळे,प्रिन्सि पल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर,रुचि का गुप्ता,अनंत तेलभ रे,शिक्षक,पालक व विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे.बदलत्या निसर्गाने मानवावर विचार करण्याची वेळ आणलीय. आपण एकीकडे कल्पनेच्या पलीकडे गगनभरारी घेतली, प्रगती साध्य केली. परंतु आपण पर्यावरणाकडे दुर्लक्ष करत आहोत याचेच वाईट परिणाम आज आपण पाहत आहोत. जागतिक तापमानाती ल वाढीमुळे पृथ्वीवरील मानवांचे सजीवांचे अस्तित्व धोक्यात आलं आहे. शुद्ध हवा ऑक्सिजन हवा असेल तर झाडांशिवाय पर्याय नाही. वृक्ष आपल्याला फक्त पाणी फुलेच देत नाहीत तर आपल्याला जगण्याचे ऊर्जा देतात,नवी आशा देतात,उमेद देतात. म्हणूनच वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे असे प्रतिपादन कार्यक्र माचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी केले.आज वृक्षारोपण कार्यक्रमा साठी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एक झाड आणले होते त्यांनी आपल्या पालकां समवेत विद्याविहार संकुल परिसरात वृक्षारोपण केले व लावलेल्या वृक्षांची विद्यार्थी दररोज देखभाल करणार आहेत. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी प्रिन्स इंग्लिश स्कूल मधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post