कोळवाडी (आळे) येथील इयत्ता सातवीचे विद्यार्थी ३२ वर्षांनी आले एकत्र... (सुदर्शन मंडले ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर आळेफाटा :- कोळवाडी (ता.जुन्नर) येथील ज्ञानेश्वरवस्तीवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील सन १९९२-९३ इयत्ता ७ वी मधील २५ माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा साजरा करण्यात आला. तब्बल ३२ वर्षानंतर सर्व वर्गमित्र एकत्रित आल्याने वातावरण भारावून गेले होते. तत्कालीन सातवीच्या वर्ग मित्र व मैत्रिणी आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. या स्नेहमेळाव्यामुळे सोनेरी आयुष्यातील रुपेरी आठवणी जागृत झाल्या व तसेच अनेकांना गहिवरून आले. व्हाटसअॅप ग्रुपच्या माध्यमातून सर्व तत्कालीन विद्यार्थी यांना संघटित करून हा स्नेहमेळावा आपल्या गुरूजनांच्या साक्षीने आयोजन केले होते. बराच वर्षानंतर जुने वर्गमित्र भेटल्याने गप्पांना, थट्टामस्करीला उधाण आलं होत. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने सकाळपासून संध्याकाळपर्यंत ओळख, स्नेहभोजन तसेच धुरानळी घाट या ठिकाणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी विद्यार्थी शरद गाढवे,रविंद्र गुंजाळ,महेंद्र पारवे,संदीप पाडेकर,विजु गुंजाळ,महेंद्र सहाने,भिमा गुंजाळ,दत्तात्रय सहाने,रेवण दिघे,अनंता गलांडे,महादू आहेर,सुनिल कु-हाडे,राजेश कणसे, उर्मिला गुंजाळ ,रेखा सहाने,सुवर्णा हाडवळे ,शिला हाडवळे,संगिता बागल,सुरेखा येंधे,प्रतिभा सहाने,मनिषा गटकळ,रोहीणी शेळके,सुलभा काळे,सिता पाडेकर आणि इतर सर्व माजी विद्यार्थी उपस्थीत होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन महेंद्र पारवे यांनी केले तर आभार शरद गाढवे यांनी मानले.
byMEDIA POLICE TIME
-
0