प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी. (शिवाजी शिंदे जिल्हा प्रतिनिधी परभणी.) सेलू : आज दि.१ ऑगस्ट,गुरुवार रोजी प्रॉस्परस पब्लिक स्कूलमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रगती क्षीरसागर, उपमुख्या ध्यापक राजेंद्र जाधव व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते. लोकमान्य टिळकांनी कामगार वर्गाला राष्ट्रीय चळवळीशी जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. जनतेला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्या साठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याची त्यांनी सुरवात केली, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची दिशा आणि दशा बदलली. यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकां ना प्रेरित केले.तसेच दलित साहित्याचे संस्थापक म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्व पूर्ण भूमिका बजावली होती. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. या कार्यक्रमा अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांनी या थोर महान व्यक्तींबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0