अडावद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा. प्रभारी सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश... ( चोपडा येथे शिवसेना कार्यालयात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली अडावदचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कै. डिगंबर दौलत पाटील यांचे भाऊ वसंतराव देशमुख पतसंस्थेचे चेअरमन मनोहर दौलत पाटील, अडावदच्या ग्रामपंचायत सदस्या तसेच मा. प्रभारी सरपंच कुसुमताई मनोहर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात आपल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रवेश घेतला. यावेळी शिवसेनेच्या संजय पाटील यांची अडावद विकास सोसायटी चेअरमन पदी निवड झाली म्हणून त्यांचा सत्कार आमदारांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकार पी . आर माळी सर ,नामदेव पाटील, सचिन महाजन, कालू मिस्तरी, इ, ग्रामपंचायत सदस्या विजिताताई हरिश पाटील, हरिश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवराज पाटील, महेंद्र धनगर, नितीन पाटील ' किशोर चौधरी आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

अडावद येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मा. प्रभारी सरपंचांचा शिवसेनेत प्रवेश...                                                         
Previous Post Next Post