*जिल्हाधिका-यांशी बैठक;ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आदिवासी संघटनांचा निर्धार* (नंदूरबार प्रतिनिधी:) डाॅ.वर्षा लहाडे जिल्हा शल्यचिकित्सक नंदूरबार यांना सक्तीच्या रजेवर पाठवून भ्रष्टाचाराची निपक्षपातीपणे चौकशी करणे व जिल्ह्यातून हकालपट्टी करा,जिल्ह्य़ातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा व प्रलंबित मागण्यांबाबत तात्काळ कार्यवाही करा,या विषयांवर नंदूरबार जिल्हाधिकारी मित्ताली शेटी यांच्याशी दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी आदिवासी संघटनांची जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात सकारात्मक चर्चा झाली.डाॅ.वर्षा लहाडेंवर कारवाईबाबत लेखी स्वरूपात पत्र जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडून आदिवासी संघटना प्रतिनिधींना देण्यात आहे.उर्वरित विषयांवरही चौकशीचे आदेश देण्यात आले.तरी मागण्यांबाबत जोपर्यंत ठोस कारवाई होत नाही,तोपर्यंत बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय आदिवासी संघटनांनी एकजूटीने घेतला.जिल्हाधिकारी मिताली शेटींनी बैठक आयोजित करून जिल्हास्तरावर लेखी कारवाई सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारीबाबत सकारात्मक भूमिका मांडून आदिवासी संघटनांनी आभार मानले. यावेळी रोहीदास वळवी राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स,जितेंद्र बागूल अध्यक्ष विश्व आदिवासी सेवा संघटना,राकेश वळवी नवापूर तालुकाध्यक्ष बिरसा आर्मी,कु.मालती वळवी सामाजिक कार्यकर्त्या नंदुरबार, पंकज वळवी जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नंदूरबार, अजय वळवी धडगांव तालुकाध्यक्ष बिरसा आर्मी,शरद पाडवी आदि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*जिल्हाधिका-यांशी बैठक;ठोस कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा आदिवासी संघटनांचा निर्धार
Previous Post Next Post