*चौकशी आदेश दडपणा-या विस्तार अधिका-याला निलंबित करा- बिरसा फायटर्सची मागणी**. ग्रामपंचायत जवखेडा येथील भ्रष्टाचारावर कारवाईसाठी गटविकास अधिका-यांना निवेदन* शहादा प्रतिनिधी: शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत जवखेडा येथील सरपंच व ग्रामसेवक संतोष सुरसिंग गिरासे यांच्या मनमानी कारभाराची व भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई करा व श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी तथा चौकशी अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी चौकशी न करून भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तात्काळ निलंबित करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, ग्रामपंचायत जवखेडाचे उपसरपंच नील भील,सदस्य गणेश पाडवी,लोहारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरेश पवार, सदस्य रामदास मुसळदे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच,ग्रामपंचायत जवखेडा ता.शहादा यांनी दिनांक ०७/११/२०२४ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता.त्या तक्रारीवर गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांनी श्री.डी.बी.बेलदार, विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिनांक २४/१२/२०२४ रोजी चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता.परंतू श्री.डी.बी.बेलदार विस्तार अधिकारी यांनी तक्रारदार उपसरपंच ग्रामपंचायत जवखेडा यांना अद्यापही चौकशीसाठीही बोलावले नाही की जबाब घेतला नाही.सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार,मनमानी व गैरकारभाराच्या चौकशीपासून वाचविण्याचा प्रयत्न केलेला आहे.वरिष्ठांचा आदेशाचे पालन न करून व भ्रष्टाचा-यांना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर करणा-या श्री.डी.बी.बेलदार शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती शहादा यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे व ग्रामपंचायत जवखेडा ता.शहादा येथील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराची ,भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0