*रांग साईडने येणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक**दुचाकीस्वाराचा मृत्यू*. (महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती ) भद्रावती,दि.१७:-चुकीच्या बाजुने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास माजरी पोलिस स्टेशन अंतर्गत पाटाळा पुलाजवळ घडली. गिरीश अशोक ढवस(३०) रा.वरोडा असे मृतकाचे नाव आहे. तो आपल्या दुचाकी क्र.एम.एच.३४ बी.एक्स.८६४१ ने वरोड्याकडून वणीकडे जात होता.दरम्यान, पाटाळा येथील वर्धा नदीच्या पुलावर वणीकडून वरोड्याकडे चुकीच्या दिशेने येणाऱ्या ट्रक क्र. एम.एच.३४ बी.जी.७००१ ने गिरीशच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चेंदामेंदा होऊन घटनास्थळी गिरीशच्या शरीरातून मोठा रक्तस्राव झाला. त्याला वरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी माजरी पोलिसांनी ट्रक चालक राजकुमार दशरथ कैथल रा.माजरी काॅलरी याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असू्न पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भद्रावती तालुक्यात चुकीच्या बाजुने वाहन चालविणाऱ्यांची संख्या वाढत असून असे अपघात घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रात्री च्या वेळी कोंढा फाटा ते टाकळी दरम्यान ट्रक चुकीच्या बाजुने जातात.तर सुमठाना ते पाॅवर ग्रीडपर्यंत चुकीच्या दिशेने वाहने चालतात. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष द्यावे अशीही मागणी आता नागरिक करु लागले आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0