*बल्हाणे येथील आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थाला बेदम मारहाण करणा-या शिक्षकांवर बाल हक्क संरक्षण व ॲस्ट्रासिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करा- बिरसा फायटर्सची मागणी*. (शहादा प्रतिनिधी-धुळे जिल्ह्यातील बल्हाणे येथील शासकिय आदिवासी किंवा अनुदानित आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थी निखिल राजेश पावरा याला बेदम मारहाण करण्याऱ्या शाळेतील शिक्षक कर्मचारी सह शाळा प्रशासनावर ॲट्रॉसिटी व बालहक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून संशयितांना अटक करा व सेवेतून निलंबित करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून आयुक्त, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक, जिल्हाधिकारी धुळे,पोलीस अधीक्षक धुळे व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प धुळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आले.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मौजे पनाखेड येथील रहिवासी राजेश गौतम पावरा यांचा मुलगा निखिल राजेश पावरा या आदिवासी विद्यार्थ्यांला शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याचा एक विडियो वाॅटसप ग्रूपच्या माध्यमातून प्रसार झालेला आहे. संबंधित गावातील विद्यार्थांचे दुरध्वनीच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेतली असता तेथील आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थीला बेदम मारहाण करणारे श्री. निलेश महाजन ,पाटिल सह रघूवंशी शिक्षक कर्मचारी सह तेथील शाळा प्रशासनाची सखोल चौकशी करण्यात यावी. घटनेचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. आदिवासी विद्यार्थांला क्रूरपणे बेदम मारहाण करण्यात आले आहे.हे शिक्षक आहेत की राक्षस आहेत, एवढ्या लहान मुलाला एवढे का मारलं? ही घटना बघून आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळेत सुरक्षित नाहीत. हे मारणारे शिक्षक कर्मचारी नोकरी करण्याचे लायकीचे नाहीत, म्हणून यांना पदावर तात्काळ हटविले पाहिजे.आदिवासी विद्यार्थी पालकाला जोपर्यंत न्याय मिळत नाही,तोपर्यंत बिरसा फायटर्स संघटना त्यांच्यासोबत राहील. मारहाण करणा-यांना माफी नाही,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केली आहे. घटने संबंधित कर्मचारी यांच्यावर ॲट्रॉसिटीचा व बाल हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व संशयितांना तात्काळ अटक करावी.मारहाण करणा-या शिक्षक कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, होणा-या परिणामास सर्वस्वी जबाबदार आदिवासी विकास विभाग प्रशासन राहील. यादी नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास देण्यात आला आहे.
byMEDIA POLICE TIME
-
0