पिंपळगाव गोलाईत जवळ लक्झरी बसला भीषण आग, बस जळून खाक. (पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) आज पुण्याहून बराणपुर धारणी येथे जाणाऱ्या खाजगी लक्झरी बसचे टायर तापल्याने त्याने पेट घेऊन पूर्ण लक्झरी जळून खाक झाल्याची घटना आज घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज सकाळी अकरा वाजता पुणे संभाजीनगर मार्गे बऱ्हाणपूर धारणी येथे जाणाऱ्या खासगी लक्झरी बस क्रमांक एम. पी. 48 झेड. एफ. 5533 ने पिंपळगाव गोलाईत गावाजवळ चालत्या खाजगी लक्झरी बसणे पेट घेऊन भीषण आग लागली. यावेळी प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने चालकाने गाडी थांबवली त्यावेळी गाडीच्या मागील टायरने पेट घेतला होता. गाडीतील सर्व प्रवाशांना आपल्या सामानासह सुखरूप खाली उतरवण्यात आले. तोपर्यंत लक्झरी बसणे पेट घेतला होता. दरम्यान बसणे भीषण आगीत रूपांतर झाल्याने ताबडतोब जामनेर नगरपालिकेतील अग्निशामन दलाची गाडी व शेंदुर्णी येथूनही अग्निशमन दलाचे गाडी आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी बोलावण्यात आली होती .लक्झरी बस मध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते सर्व प्रवासी चालक, वाहक सुरक्षित आहेत. कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान पहूर जामनेर रोडवर लक्झरी बसला भीषण आग लागल्याने जवळपास अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच पिंपळगाव गोलाईत येथील सरपंच व ग्रामस्थ या सर्वांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यास व वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.
byMEDIA POLICE TIME
-
0