**ग्रामीण शिक्षण संस्था, पाडळसे यांची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न****. पाडळसे (ता. यावल)** - ग्रामीण शिक्षण संस्था, पाडळसे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची सन २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधीसाठीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकारी मंडळ आणि नियामक मंडळाचे सदस्यही बिनविरोध निवडून आले.या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. श्री. उदय मधुकर चौधरी यांची निवड झाली, तर उपाध्यक्षपदी श्री. रामराव विठ्ठल पाटील आणि चिटणीसपदी श्री. प्रवीण प्रभाकर चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आश्रयदाते व उपकारकर्ते या श्रेणीतून श्री. अरुण नेमचंद चौधरी यांची निवड झाली. कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून खालील सदस्यांनी स्थान पटकावले:१) श्री. अनिल लिलाधर चौधरी२) श्री. जयंत मुरलीधर पाटील३) श्री. ललितकुमार रमेश पाटील४) श्री. प्रमोद रामकृष्ण बऱ्हाटे५) श्री. शरद तुकाराम बऱ्हाटे६) श्री. विनायक मधुकर पाटील७) श्री. योगराज डिगंबर बऱ्हाटे८) श्री. युवराज मधुकर पाटीलतसेच, नियामक मंडळ सदस्य म्हणून १) श्री. गोपाळ पिला पाटील, २) श्री. रघुनाथ नारायण बऱ्हाटे, आणि ३) श्री. सोपान खेमा पाटील यांची निवड झाली. असे एकूण १५ सदस्य बिनविरोध निवडून आले.या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. एस.एल. पाटील सर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री. मयुर भगवान पाटील सर, आणि मदतनीस म्हणून श्री. किशोर अरुण नेहेते सर व श्री. योगेश बळिराम नेहेते यांनी काम पाहिले.ग्रामीण शिक्षण संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उदय मधुकर चौधरी यांनी मतदार आणि ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0