सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;-२९ जूनला मतदान;-निवडणूक कार्यक्रम जाहीर. सोयगाव;-सोयगाव तालुका खरेदी विक्री संघासाठी( ता.२९ जून) मतदान होणार आहे तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूक कार्यक्रम शुक्रवारी (ता.२३) जाहीर झाला असून या संस्थेसाठी १७ जागांसाठी २ हजार ७११ मतदार मतदान करतील अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी संजय गाजुलवाड यांनी दिली आहे   तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीची दहा वर्षांत पहिल्यांदा निवडणूक होत आहे सन २०१५ नंतर २०२५ मध्ये ही निवडणूक होत आहे सोयगाव, फरदापुर आणि बनोटी या तीन गटात १७ जागांसाठी मतदान होणार असून सोमवार (ता.२६) ते गुरुवार (ता.३०) निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे.याच कालावधीत नामनिर्देशन पत्र प्रसिद्धी करण्यात येणार आहे नामनिर्देशन पत्र छाननी (ता. २ जून) व वैध नामनिर्देशन पत्र उमेदवारी यादी प्रसिद्धी( ता.०३ जून) व उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी (ता.०३ जून ते १७ जून) पर्यंत मुदत आहे.दरम्यान निवडणूक लढविण्याऱ्या उमेदवारांची अंतिम यादी  व निवडणूक चिन्ह वाटप (ता.१८) जून प्रसिद्ध करण्यात येईल व मतदान (ता.२९) जून  घेण्यात येणार आहे मतदान होताच मतमोजणी करून (ता.२९) रात्री उशिरा निकाल घोषित करण्यात येणार आहे दरम्यान १७ जागांसाठी सहा मतदार संघासाठी ही निवडणूक होत असून यामध्ये  सर्वसाधारण मतदार संघात-९,जागा,सोसायटी मतदार संघ-३,जागा,महिला राखीव-२ जागा,अनुसूचित जमाती,-जागा१,इतर मागासवर्गीय-जागा १,विमुक्त जमाती-भटक्या जमाती-जागा १ याप्रमाणे १७ जागांसाठी  सहा मतदार संघात ही निवडणूक होत आहे.त्यामुळे सोयगाव तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे...

सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;-२९ जूनला मतदान;-निवडणूक कार्यक्रम जाहीर.                                                                   
Previous Post Next Post