गौरखेडा येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न.. (सावदा (प्रतिनिधी) - दि.२७ रोजी प्रधानमंत्री धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान योजना उपकेंद्र कुंभारखेडा अंतर्गत गौरखेडा येथे डॉ अमोल दादा भंगाळे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ चित्रलेखा पाटील मॅडम , डॉ दिपल पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी* यांच्या आदेशानुसार आयुष्यमान भारत कार्ड शिबिर घेण्यात आले. व प्रधानमंत्री मातृवंदना योजना,टी.बी.मुक्त भारत स्क्रिनिंग करण्यात आले व निक्षय पोषण योजना,मिशन इंद्रधनुष्य माध्यमातून लसीकरण मोहीम राबविण्यात आले. याप्रसंगी .प्रितेश पाटील समुदाय आरोग्य अधिकारी, जीवन सोनवणे आरोग्य सहाय्यक, पुरुषोत्तम तायडे आरोग्य निरीक्षक, मोहन नेरकर आरोग्य सेवक, पी.पी.भगाळे आरोग्य सेविका, हमीदा तडवी, जयश्री बोंडे, मनिषा जंगले, सुनिता भालेराव आशा स्वयंसेविका, भारती बोंडे मदतनीस सर्व कर्मचारी हजर होते.व ग्रामपंचायत गौरखेडा ग्रामसेवक संजय महाजन,सरपंच सुमित्रा भालेराव,ग्रा.प.सदस्य महेंद्र पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले

गौरखेडा येथे आयुष्यमान भारत कार्ड शिबिर संपन्न..           
Previous Post Next Post