हिप्परगा थडी येथे वृक्षरोपण मासाची भव्य सुरुवात, बिलोली तालुका शिक्षक सेनेचा धडका. ( मारोती एडकेवार सर्कल :प्रतिनिधी सगरोळी )सगरोळी: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, वाढदिवसानिमित्त 27 जून ते 27 जुलै या कालावधीत संपूर्ण, राज्यभर वृक्षारोपण मास साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमाची संकल्पना अभ्यासू शिक्षक,आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष, मा. ज. मो. अभयंकर साहेब यांची असून. राज्य उपाध्यक्ष, मा विठू भाऊ चव्हाण सर,जिल्हा अध्यक्ष मा संतोष पाटील अंबुलगेकर, उपाध्यक्ष शंकर आमंद सर,व संपूर्ण जिल्हा कार्यकारणी यांच्या मार्गदर्शनाखाली, व बिलोली तालुका शिक्षक सेनेचे, तालुका सचिव राजाराम कसलोड,उपाध्यक्ष शिवराज मागीलगे, इरेशम झप्पलकर, यांच्यासह, तालुका कार्यकारिणीच्या सहकार्याने शिक्षक, सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष पर्यावरण प्रेमी शिक्षक बालाजी लचगोंडा गेंदेवाड, यांच्या पुढाकारातून या उपक्रमाची शुभारंभ बिलोली तालुक्यातून सर्वप्रथम हिप्परगा थडी येथे झाले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगा थडी येथील, शिक्षक वृंद व ग्रामस्थांच्या,उपस्थितीत सदरील वृक्षारोपण हिप्परगा थडी येथील शमशानभूमी परिसरात करण्यात आले, ज्येष्ठ नागरिक व माजी चेअरमन मा. अहमद साहेब यांच्या हस्ते,वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. या उपक्रमाची विशेष बाब ठरली. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, मा नाईक सर,सूर्यकांत गायकवाड सर,संजय गायकवाड सर, रामदास संगेवार सर,अजय कोंडलवाडे सर,व सर्व शिक्षक व हिप्परगा थडी, गावातील पोलीस पाटील शंकर आप्पा मठपती, सरपंच रहेबर इनामदार, तंटामुक्ती अध्यक्ष शेषेराव मामडे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सय्यद एजाज, सय्यद हबीब पटेल, उबाठा शाखा अध्यक्ष इरफान देसाई,इम्रान पटेल, यादराव पाटील चिंनोड, विजय भुरे, सय्यद युसुफ साब, अहमद बेग, लतीफ पटेल, बाबूसाब, हुसेनसाब, राजू तंगनोड, आणि ग्रामस्थ,युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेंदेवाड सर यांनी उपस्थित गावाकऱ्यांना वृक्षरोपणाचे, पर्यावरणीय सामाजिक महत्त्व, समजावून सांगितले, वृक्ष लावा जीवन वाचवा या मंत्राने, हिप्पारगा थडी येते, व वृक्षारोपण मासाची भव्य अशी सुरुवात व कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
byMEDIA POLICE TIME
-
0