शहरात पिसाटलेल्या वानराचा धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण (धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष )शहरात पिसाटलेल्या वानराचा धुमाकूळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणधर्माबाद शहरात सध्या एका पिसाटलेल्या वानराचा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षक कॉलनी येथे पाहुण्याच्या घरी जात असताना मारुती पटणे (वय ५०) यांच्यावर वानराने अचानक झडप घालून चावा घेतला.फक्त एवढ्यावरच न थांबता या वानराने आतापर्यंत शहरातील किमान १३ ते १४ नागरिकांना जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. हे वानर दुचाकी वाहनांवर उड्या मारून प्रवाशांना जखमी करत आहे. यामध्ये अनेक वयोवृद्ध महिला व पुरुषांचा समावेश आहे.हुतात्मा स्मारक परिसरात शाळा व कॉलेजच्या वेळात विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी या वानरामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. फुलेनगर भागात तर वानराने अनेकांना चावा घेतल्याचे निदर्शनास आले आहे.नागरिकांनी प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली असून वनविभागाने लक्ष घालून या पिसाट वानराला पकडावे, अशी मागणी शहरवासीयांकडून मागणी होत आहे.धर्माबाद तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष
byMEDIA POLICE TIME
-
0