उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कर्करोग निदान शिबिर संपन्न. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.२८) राष्ट्रवादी पक्ष धर्माबादच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कर्करोग निदान शिबिर व समोपदेशन, शालेय विद्यार्थ्यांना खाऊवाटप तर ग्रीन फील्ड इंग्लिश शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवसानिमित्त जनविश्वास सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी शिक्षण सभापती शिवराज होटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापतीगणेशराव करखेलीकर, प्रमुख पाहुणे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मी नारायण केसटवार, डॉ. शिवप्रेमा विभुते, कर्करोग समोपदेशक डॉ. विकास चव्हाण, डॉ. राम गुजरवाड, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वडजे, नायगाव विधानसभा अध्यक्ष शिवराज गाडीवान उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दीपक चोळाकेकर, कार्याध्यक्ष नारायण पवार, शहराध्यक्ष नरेंद्ररेड्डी आरकलवाड, जिल्हा चिटणीस किरण बेंद्रे, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी आलुरकर, तालुका सरचिटणीस सतिश शिंदे, युवानेते सोनू बन्नाळीकर, युवक तालुकाध्यक्ष शिवाजी पाटोदेकर, विधानसभा अध्यक्ष नागेंद्र कदम, माजी नगरसेवक बिरप्पा मदनुरकर, साई किरण गौड, साईनाथ मिरदोड, कृष्णा मुळी, गोपीराज कारेगावकर, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष गंगाधर घडेकर, विक्की पालदेवार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.तालूका प्रतीनीधी सज्जन संतोष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कर्करोग निदान शिबिर संपन्न.                               
Previous Post Next Post