मौ. हरणाळी/ ममदापूर ग्रामपंचायत येथे हनुमंत शिंदे यांचे आमरण उपोषण (मारोती एडकेवार नांदेड जिल्हा /प्रतिनिधी नांदेड ): नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील मौजे हरनाळी /ममदापूर गट ग्रामपंचायत मध्ये, दलित वस्ती येथे पिण्याच्या पाण्यासाठी हनुमंत शिंदे यांचा आमरण उपोषण,मौजे हरनाळी /ममदापूर,गट ग्रामपंचायत येथील दलित वस्तीमध्ये, येणाऱ्या पाणी व बोरवेल वर, मालकीण हक्क दाखवणाऱ्या, सरपंच साहेबराव शिंदे,यांच्यावर कायदेशीर कारवाई करवण्यात यावी. सदरील बोअरवेल,ग्रामपंचायत कार्यालयात नोंदी घेण्यात यावी.याबरोबरचे पाणी गेल्या 15,वर्षापासून दलित वस्तीमध्ये कामगार महिला शेतकरी सर्व पाण्याचा लाभ घेत आहेत. सदरील, या विषयी हनुमंत शिंदे यांनी मुख्याधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे दिनांक 14 /7/2025 रोजी सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली. आहे व उपोषणाचा इशारा सुद्धा देण्यात आला.बोरवेल हे दलित वस्ती अंतर्गत असल्याचे सरपंच यांच्याशी विचारले असता, त्यावर त्यांनी सरपंच साहेबराव शिंदे हे माझ्या मालकीचे आहे.असे बोलून दलित वस्ती मधल्या लोकांना त्यांनी त्रास देत आहेत,व धमकी देत आहेत तरी,सदरील जिल्हा परिषद शाळेच्या समोरील बोरवेल हे गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून हरणाळी गावातील, सर्व शेतकरी मजूर कामगार नागरिक या बोर वरचे पाणी पिण्यासाठी याचा उपयोग घेत आहेत.तरी असे अचानक आधीच येऊन त्यांना सरपंच यांनी धमकी देऊन पिण्याचे पाणी बंद केले आहे,याचा परिणाम संपूर्ण गावावर आणि पाणीटंचाई होत आहे, तरी त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करून, ते सार्वजनिक बोर हा गावासाठी व दलित वस्तीसाठी खुला करण्यात यावा ही नम्र विनंती,अन्यथा आपण न्याय मिळवून न दिल्यास हा न्यायालय,महा पोलीस स्टेशन येथे दात मागण्यात येईल,व 90 दिवसानंतर हे प्रकरण कायदेशीर न्यायालयात हलवण्यात येईल असे हनुमंत शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
byमीडीया पोलीस टाईम
-
0