अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्ग यावल ते फैजपूर पर्यत दुरूस्तीकरा : चेतन अढळकर.. (यावल दि.८ ( सुरेश पाटील )अंकलेश्वर - बऱ्हाणपूर या महामार्गावरील यावल ते फैजपूर पर्यंतचा महामार्ग तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधी विभाग राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केली आहे.जळगाव येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग व्यवस्थापक यांच्याकडे दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आपल्या कार्यक्षेत्रात येणारा रस्ता म्हणजे अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्ग हा आहे.या महामार्गावर यावल ते फैजपूर पर्यंतचा रस्ता अतिशय खराब झाला असून सदर रस्त्याचे सध्या चालू असलेले देखभाल दुरूस्ती तात्काळ सुरू करण्यात यावे.याबाबत आपण ठेकेदाराला आदेश पारीत करावे कारण येणाऱ्या गणेशोत्सवासाठी हा महामार्ग त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे.कारण रावेर व बुऱ्हाणपूर या ठिकाणाहून मोठमोठे गणपती'आणले जातात व गणेश भक्तांना त्यासाठी मोठी कसरत करावी लागते व रस्त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत व सदरील रस्त्यावर मोठया प्रमाणावर वाहतूक असून दुचाकीस्वारांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. तरी पावसाळ्यात या मोठ्या प्रमाणातपडलेल्या खड्डयामुळे अपघात होऊन निष्पाप नागरिकांना आपला जिव गमवावा लागु शकतो.यावल चोपडा हा रस्ता जसा दुरूस्ती करण्यात आला तसाच यावल ते फैजपूर पर्यंतचा रस्ता दुरुस्ती तात्काळ करण्यात यावा. अन्यथा गणेशोत्सवाचे महत्वाचे दिवस लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित विधि विभाग राज्य उपाध्यक्ष चेतन आहे अढळकर यांची स्वाक्षरी असून निवेदनाच्या प्रती मा.नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय मंत्री, भारत सरकारमा.रक्षाताई खडसे, केंद्रीय राज्य मंत्री, भारत सरकार मा.अमोलभाऊ जावळे आमदार यावल- रावेर मतदार संघजिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दिल्या आहेत.
byMEDIA POLICE TIME
-
0