पत्रकार जावेद अहमद यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती ( रामतीर्थ सर्कल प्रतिनिधी :- गणेश कदम ) देगलूर येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांची आज मानवी हक्क, अधिकार व मुल्यांसाठी लढणाऱ्या राष्ट्रीय संघटना डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेचे डायरेक्टर दानिश खान यांनी सदर नियुक्ती केली असून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांच्यावर नांदेड जिल्ह्यातील संघटन बांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे. संचालक मंडळाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र सर्व जिल्ह्यांमधील रिक्त पदे भरण्यासह संस्थेच्या नियमांनुसार सर्व काम करतील आणि जिल्ह्यातीलसंपूर्ण टीमचे पर्यवेक्षण करतील, असे नियुक्ती करतांना डायरेक्टर दानिश खान यांनी सांगितले. दरम्यान, नव नियुक्त नांदेड जिल्हा अध्यक्ष जावेद अहेमद म्हणाले की, डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या तत्वानुसार मी राज्यात संघटनेची बांधणी करेल. तसेच संघटनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण कसोशीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. या निवडीबद्दल सर्व स्तरातून पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पत्रकार जावेद अहमद  यांची डीके फाउंडेशन ऑफ फ्रीडम अँड जस्टिस संघटनेच्या नांदेड जिल्हा अध्यक्षपदी  नियुक्ती                                                                               
Previous Post Next Post