*रावेर येथे सेवानिवृत्त शिक्षकांचे स्नेहसंमेलन संपन्न*. (रावेर (प्रतिनिधी) – येथे महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी संघटनेचे तालुका स्तरीय स्नेहसंमेलनाचे आयोजन माजी सैनिक बहुउद्देशीय सभागृह, जुना सावदा रोड,रावेर येथे करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष भगवान वाघे, जिल्हा चिटणीस अविनाश मोरे हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान वाघे यांनी सांगितले की, *"सेवानिवृतांची सेवा हीच खरी सेवा"* असून त्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी असोत त्या सोडवून त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे व त्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्या चेहऱ्यावर आलेला आनंद हीच आपल्या सेवेची पावती असल्याचे ते म्हणाले. तर जिल्हा सरचिटणीस अविनाश मोरे म्हणाले कि, जो इतरांच्या समस्यांची जाण ठेवतो आणि सेवानिवृत्तांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देवून कामे पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करतो, त्यालाच खऱ्या अर्थाने सेवानिवृतांच्या सेवेचा आनंद घेता येतो. प्रास्ताविकात तालुकाध्यक्ष हर्षवर्धन तायडे यांनी सांगितले कि, संस्थापक व राज्याध्यक्ष मधुकर जंगम यांनी सांगितले कि सेवेत असतांना सेवानिवृत्तांच्या अनेक अडचणी मी पहिल्या आहेत आणि त्या सोडविण्यासाठीच या संघटनेची निर्मिती करण्यात आली हे त्यांचे वाक्य आज सेवानिवृतांच्या अडचणीसाठी गट विमा असेल, संलग्न गट विमा, फंड किंवा उपदान, अंशदान यासाठी सेवानिवृत्तांना जो मनस्ताप सहन करावा लागतो तो त्रास या संघटनेमुळे कमी झालेला आहे. सदर संघटनेतील सभासद हे पुरस्कारांनी गौरवान्वित आहेत. त्यात राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त हबीब तडवी, मोहम्मद तडवी, दिलीप पाटील, सायबू तडवी हे असून त्यांचा संघटनेच्या वतीने या स्नेहसंमेलनात शाल व पुष्प गुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ सभासद सुभान तडवी, रा.सि.महाजन, ज्ञानेश्वर पाटील, हुसेन तडवी, हारून जमादार, किशोर चौधरी, पुंडलिक फिरके, मोहन फिरके, सैयद अफजल हे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमात संतोष बाविस्कर,मिलिंद सूरदास, शांताराम विचवे,भागवत चौधरी, रवींद्र सोनार, यावर अली मो. यावर, छगनलाल महाजन, जगन्नाथ अजलसोंडे, श्रीमती कल्पना सावकारे, हेमलता सावकारे, रत्नप्रभा भालशंकर, सुरेश चिमणकारे, मुरलीधर नेमाडे, सलीम तडवी आदींसह सभासद उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील सर यांनी केले तर आभार हबीब तडवी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी दिलीप पाटील,संतोष बाविस्कर,मिलिंद सूरदास, छगनलाल महाजन, गणेश महाजन यांनी परिश्रम घेतले.

रावेर येथे सेवानिवृत्त शिक्षकांचे स्नेहसंमेलन संपन्न*.      
Previous Post Next Post