शेतकऱ्यांचा न्याय्य मागण्यासाठी भाजप सरकार विरोधात खासदार अमरभाऊ काळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन..! वर्धा येथे महाविकास आघाडीच्या वतीने भव्य धरणे आंदोलन..!आज वर्धा येथे खासदार अमरभाऊ काळे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचा वतीने अतिवृष्टीग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या न्याय्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात वर्धा जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे नेते, शेकडो शेतकरी बांधव, कार्यकर्ते आणि नागरिक एकवटले.शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, अतिवृष्टीग्रस्तांना हेक्टरी ₹५०,००० मदत, तसेच कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत या मागण्या जोमाने मांडण्यात आल्या. “झोपी गेलेल्या सरकारला जागं करण्याची वेळ आली आहे...शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील!”शेतकऱ्यांचा आवाज बुलंद न्यायासाठी लढा सुरूच!#वर्धा_धरणे_आंदोलन #शेतकरी_न्याय #महाविकास_आघाडी मो मकसूद बावा पत्रकार वर्धा जिला क्षेत्र
byMEDIA POLICE TIME
-
0