*वर्धा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देण्यात अँड सुधीर कोठारी यांचे मोलाचे योगदान**राज्यमंत्री पंकज भोयर यांचेकडून गौरव* हिंगणघाट वर्धा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देण्याचे कामात अँड सुधीरबाबू कोठारी यांचे मोलाचे योगदान असून हे सहकार क्षेत्र पवित्र ठेवण्याचे काम करण्यासाठी त्यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्षात अधिक जोमाने प्रयत्न करावेत मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असे उदगार राज्याचे गृह व सहकार राज्यमंत्री ना. पंकजजी भोयर यांनी काढले. ते वणा नागरिक सहकारी बँकेच्या मांडगाव येथील अकराव्या शाखेच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. ना. भोयर यांनी बँक चालवीने हे कठीण काम असूनही अँड कोठारी यांनी अतिशय कुशलतेने या बँकेचे माध्यमातून रोजगार निर्मिती सोबत गरजूना कर्जाची उपलब्धता करून दिली. याच वेळी त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेने या जिल्ह्यातील हजारो बळीराजांचे पैसे बुडवून सहकार क्षेत्राला काळिमा फासण्याचे काम या जिल्ह्यात झाले ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असून या मध्यवर्ती बँकेला वाचविण्याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री ना. फडणवीसजी यांना असून देवेंद्रजी मुळे ही बँक पूर्ववत सुरु आहे. परंतु ज्यांनी ही बँक डबघाईस आणली त्यांना अँड सुधीरबाबू कोठारी यांनी बँक कशी चालवावी यांचा पाच टक्के तरी शहाणपणा तरी शिकवायला हवा होता असा उपरोधीक टोला वर्धेतील एका ज्येष्ठ नेत्यांचे नाव न घेता हाणला. यावेळी आ. समीरभाऊ कुणावार यांनी सहकार क्षेत्रातील प्रत्येक चांगल्या कामा साठी मी पक्षभेद सोडून अँड कोठारी यांचे सोबत असून महाराष्ट्रात आज हिंगणघाट शहराची ओळख ही बाजार समितीमुळे असून कठीण गोष्ट सोपी करण्यात अँड कोठारी यांचा हातखंडा असल्याचे प्रशस्तीपत्रक दिले. माजी राज्यमंत्री ना. रंजितदादा कांबळे यांनी एन. पी. ए. शून्य असणारी ही एकमेव बँक असून यासाठी राजकारण न करता शिस्तीत बँक चालविण्याच्या त्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक केले. यावेळी माजी आमदार प्रा. राजूभाऊ तिमांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर समुद्रपूर बाजार समितीचे सभापती हिम्मतरावजी चतुर, समुद्रपूर नगर पंचायतच्या अध्यक्षा योगिताताई तुळणकर, उपाध्यक्ष बाबारावजी थुटे, खरेदी विक्री संघांचे उपाध्यक्ष सुरेंद्रभाऊ कुकेकर, मेहेरबाबा ग्रामीण पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्रजी थोरात, भाजपा जिल्हा सचिव किशोरजी दिघे, माजी जिल्हाध्यक्ष भाजपा सुनीलजी गफ्फात व मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकातून अँड सुधीरबाबू कोठारी यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती देऊन पुढील प्रस्तावित कार्याची माहिती दिली. डॉ निर्मेशजी कोठारी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. संचालन दीपकभाऊ माडे यांनी केले आभार हेमंतभाऊ पाहुणे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सर्वश्री वणा बँकेचे उपाध्यक्ष सुरेशजी सायंकार, संचालक वरुणजी लोढा, अक्षयजी ओस्तवाल, कामगार नेते आफताब खान, हिंगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीषजी वडतकर, जेष्ठ संचालक मधुकरराव डंभारे, उत्तमराव भोयर, मधुसूदनजी हरणे, ओमप्रकाशजी डालिया, अशोकजी उपासे, प्रफुलभाऊ बाडे, राजुभाऊ मंगेकर, घनश्यामजी येरलेकर, शुभ्रबुद्धजी कांबळे, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंगजी देशमुख, जैन स्थानक हिंगणघाट भागचंदjib ओस्तवाल, राजेशजी कोचर, हेमंतजी ओस्तवाल, ललवाणी, कासवा, हिंगणघाट खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिगांबररावजी चांभारे, उपाध्यक्ष राजुभाऊ भोरे, तेजसभाऊ तडस, डॉ सुधाकरजी लांबडे, डॉ सुधाकरराव वेले, नामदेवराव तळवेकर, शंकरराव मांजरे, अनिलभाऊ दौलतकर, समुद्रपुर बाजार समितीचे संचालक पिंटूभाऊ बादले, हेमंतभाऊ पाहुणे, जनार्धनजी हुलके, अरुणजी बकाल, अमरभाऊ झाडे, समुद्रपूर खरेदी विक्री संघांचे संचालक शालिकराव वैद्य, हरिभाऊ बोबले, हरिभाऊ धवणे, डॉ. युवराजजी तांदुळकर, दिनेशजी महाकाळकर, चांगदेवजी मुंगल, राजुभाऊ चाफले,अशोकजी रामटेके, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मयूरभाऊ डफरे, संतोषराव खाडे, रामभाऊजी चौधरी, जगनराव सुमटकर, अरुणराव झाडे, उमाकांतजी डंभारे, बाबारावजी रहाटे, प्रणयजी डालिया, चेतनभाऊ तन्ना, गजाननजी पारखी, गजाननजी पाहुणे, संजयभाऊ लाखे, गोपालजी डफ, स्वप्नीलभाऊ पाहुणे, रवींद्रजी जोहरी, धीरजभाऊ मांडवकर, संजयजी शेगोकार, राजुजी मेंढे, माणिकराव चामडे, सचिनभाऊ तुळणकर, गजाननजी दुर्गे, विनोदभाऊ हिवंज, गुणवंतजी पाहुणे, त्र्यंबकजी किरपाल, मेहेरबाबा ग्रामीण पत संस्थेचे उपाध्यक्ष अमोलभाऊ सायंकार, लक्ष्मनजी भगत, अविनाशजी डांगरी, प्रमोदभाऊ बोरकर, हिरामणजी जोगे, प्रफुलभाऊ कांबळे, विलासभाऊ पानसे, पांडुरंगजी घाटे, संदीपभाऊ झाडे, गुरुदयालसिंग जुनी, राजूभाऊ झाडे, पंकजभाऊ काकडे, सुरेंद्रभाऊ टेभुर्णे, विक्रांतभाऊ भगत, सुनीलभाऊ इंगोले, पवनभाऊ मुडे, अविनाशभाऊ गिरडकर, पंकजभाऊ लाटकर, नितीनभाऊ सरोदे, शुभमभाऊ उमाटे, महेंद्रभाऊ शिरोडे, मधुभाऊ कामडी, रवीभाऊ झाडे, सचिनभाऊ थुटे, मोहनजी उमाटे, रवीभाऊ लढी, गजाननजी राऊत, शेषरावजी तुळणकर, तसेच मोठ्या प्रमाणात समुद्रपुर व हिंगणघाट शहरातील सर्व सामान्य जनता उपस्थित होती. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट

वर्धा जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राला दिशा देण्यात अँड सुधीर कोठारी यांचे मोलाचे योगदान**राज्यमंत्री पंकज भोयर यांचेकडून गौरव*                                                                                
Previous Post Next Post