सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा आणि धार्मिक उन्मादाचा तीव्र निषेध..!**संविधान व न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही!*. भारताचे सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र मा. न्यायमूर्ती भुषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात झालेला भ्याड हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरचा नाही, तर भारताच्या संविधानावर आणि सामाजिक समतेवर झालेला हल्ला आहे.हा प्रकार देशातील धर्मांध शक्तींना शासनाकडून मिळालेल्या मोकळीकतेचे द्योतक आहे.तसेच प्रसिद्ध पर्यावरणवादी व शिक्षणसुधारक मा. सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध करून त्यांच्या त्वरित सुटकेची मागणी करण्यात आली.सोबतच जातनिहाय जनगणना अविलंब करण्यात यावी ही मागणी आहे.आज हिंगणघाट येथे ओबीसी संघर्ष समिती व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या सर्व घटनांचा तीव्र निषेध करत भव्य निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.यामोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा), भारतीय काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.#OBCसंघर्षसमिती #भुषणगवई #SonamWangchuk #संविधानरक्षण #निषेधमोर्चा #JusticeForGavai #FreeSonamWangchuk #CasteCensusNow

सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा आणि धार्मिक उन्मादाचा तीव्र निषेध..!**संविधान व न्यायव्यवस्थेचा अपमान सहन केला जाणार नाही!*.                                                                                                                
Previous Post Next Post