भद्रावती नगरपरिषद निवडणूक—अनिलभाऊ धनोरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. (महेश निमसटकर जिल्हा प्रतिनिधी भद्रावती )भद्रावती दि.17:- नगरपरिषद निवडणुकीत आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनिलभाऊ धनोरकर यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.अर्ज दाखल करताना वरोरा-भद्रावती विधानसभा आमदार मा. करणजी देवतळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मा. रविंद्रजी शिंदे, ज्येष्ठ नेते किशोरजी बावणे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यकर्त्यांमध्ये दिसलेला उत्साह, एकजूट आणि दृढ विश्वास हे आगामी विजयाचे स्पष्ट संकेत देणारे ठरले.भद्रावतीच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व स्वच्छ प्रशासनासाठी तसेच जनतेच्या मुद्द्यांना प्राधान्य देणाऱ्या कार्यशैलीसाठी भाजप कटिबद्ध आहे.आजची भक्कम उपस्थिती आणि मिळालेला जनसमर्थनाचा उत्साह—याचातून आपल्या प्रगतीच्या मार्गाला नवी ऊर्जा प्राप्त होत आहे.“भद्रावतीच्या विकासासाठी ठाम पाऊल… विजयाची सुरुवात आजच्या उमेदवारी अर्जातून!
byMEDIA POLICE TIME
-
0