कांग्रेस न.प. उमेदवारांना ए.बी. फार्म देवू शकलो नसल्याने पदाचा राजीनामा: डाॅ राजपाल भगत आर्वी: कांग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार उमेदवारी अर्ज मिळवण्यासाठी दि. 28नोव्हे. 2025 शुल्कासह अर्ज मागितले होते. त्यासाठी नगराध्यक्ष साठी पाच हजार व नगर सेवकासाठी दोन हजार असे शुल्क आकारून वर्धा इंदिरा सद्भावना भवन येथे अगदी वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुलाखती सुद्धा घेतल्या गेल्या होत्या. त्याशिवाय वर्धा जिल्हा निरीक्षक मा. मुळक यांच्या नागपूर येथील निवासस्थानी उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटी सुद्धा घेतल्या होत्या. त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनुसुचित विभाग वर्धा या नात्याने मी सुद्धा उपस्थित होतो चार दिवालीच्या आत मुळकसाहेब अनंतराव मोडक व शैलेशजी अग्रवाल यांच्या चर्चा झाल्या. पण चर्चेचं गुढ मात्र उमेदवारांना शेवटपर्यंत कळलं नाही. अगदी उत्साहाने भावी नगरसेवकांनी आमच्यावर विश्वास ठेवून व्याज बट्टयाने पैसे घेवून आवश्यक कागदपत्राची पूर्तता केली. आणि आणलाईन फार्म भरून अनंतराव.मोहोड यांनी वर्धा टी पाईंट जवळ घेतलेल्या इमारतीत भावी उमेदवार अगदी उत्साहाने ए. बी. फार्म ची वाट पाहत होते. अगदी अडीच वाजता आम्ही ए.बी. फार्म देवू शकत नाही असा संदेश मा. शैलेश अग्रवाल यांनी दिला. ज्यांना अपक्ष फार्म भरायचा आहे त्यांनी तो भरावा असं सांगत जबाबदारी झटकत होते. निवडणूक प्रक्रीया राबविण्यात अग्रसर असलेले अनंतराव मोहोड हे प्रदेश कार्यकारणीत सरचिटणीस व मा. शैलेश अग्रवाल हे राष्ट्रीय कमेटीतील को आर्डीनेटर शिवाय मी स्वत: जिल्हा उपाध्यक्ष अनुसुचित विभाग ,आम्ही तिघेही उमेदवारांना ए.बी. फार्म देण्यास असमर्थ ठरल्याने पक्षात आमची पत शुन्य असल्याचं सिद्ध झालं. त्याच बरोबर पक्ष निवडणूक प्रक्रीयेच्या नावावर कार्यकर्त्याना लुटतं असं सिद्ध झालं. तर एका नविन पक्ष प्रवेश केलेल्या व्यक्तीच्या हातात ए.बी. फार्म सोपवून अनाधिकृत पद्धतीने निवडणूक लढवित असल्याने अशा पक्षात काम करणं शक्य होणार नसल्याचे सांगत मी या थोटांग निवडणूक प्रक्रियेत सहभागी असल्याने भावी उमेदवारांच्या राजकिय करीअर शी आम्ही खेळलो असं मान्य करून लवकरच पदांचा राजिनामा देणार असल्याची माहीती डाॅ राजपाल भगत यांनी दिली. माझ्यापेक्षा उमेदवारांच्या राजकिय करीअर शी खेळण्यात प्रदेश सरचिटणीस अनंतराव मोहोड व राष्ट्रीय को आर्डीनेटर मा. शैलेश अग्रवाल हे दोघेही जबाबदार असल्याने यांनी सुद्धा राजीनामा द्यावा असे मत व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0