यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत केंद्र पातळी क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ शाळेत करण्यात आले. यामध्ये पहिली दुसरी व तिसरी चौथी या गटांमध्ये चमच्या लिंबू, बडबड गीते , वक्तृत्व, वेशभूषा, 50 मीटर धावणे, बेडूक उडी ,लांब उडी, उंच उडी अशा वैयक्तिक स्पर्धा तसेच खो-खो ,लेझीम, कविता गायन, लंगडी, भजन, लोकनृत्य अशा अनेक सांघिक स्पर्धांचे आयोजन याप्रसंगी करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सखाराम शेंडकर यांनी केले.कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने धावपटू रमेश खरमाळे त्यांच्या समवेत सन्मा.जानकुशेठ डावखर ,प्रदीप शेठ पिंगट, राजू शेठ पिंगट, ग्रामपंचायत सदस्य कमलताई घोडे, मंदाकिनी नायकोडी ,कैलास औटी ,कैलास आरोटे , नाजिम बेपारी , सामाजिक कार्यकर्ते श्री.स्वप्निल भंडारी ,दादाभाऊ मुलमुले, नाना भुजबळ केंद्रप्रमुख वनिता हांडे , इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहुन मनोगत व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेनिमित्त शुभेच्छा दिल्या. लोकनृत्य स्पर्धेने स्पर्धेची सुरुवात झाली आणि सर्व विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे बक्षिस रूपाने कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनी खेळीमेळीच्या वातावरणात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. केंद्रातील सर्व शिक्षक वृंदांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. तसेच सन्माननीय कैलास आरोटे, सोन्या भाऊ पवार यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले. स्पर्धेमध्ये विजयी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी सन्मा.अण्णासाहेब मटाले व सन्मा.सुधाकर सैद ,सन्मा अशोक बांगर यांच्या माध्यमातून पारितोषिके देण्यात आली. बक्षीस वितरण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रितम मुंजाळ ,उपाध्यक्ष वैशाली मटाले ,सदस्य ईश्वर पिंगट, विलास पिंगट, स्वाती कोकणे ,नसरीन पठाण, रेश्मा बनकर, पायल सोनवणे यांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण केले. शाळेतील सर्व स्पर्धांचे नियोजन शाळेचे उपशिक्षक मिरा बेलकर, हरिदास घोडे,रोहिदास साळवे , प्रविणा नाईकवाडी, नूरजहाँ पटेल ,सुषमा गाडेकर ,अंजना चौरे यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष डुकरे यांनी केले तर आभार अशोक बांगर यांनी मानले.

Previous Post Next Post