देशात मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सरकारने फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी! (मुख्य संपादक हमीद तडवी जळगाव). :देशातच नव्हे तर राज्यातील शहरासह ग्रामीण भागातील महिला व मुली आजही देश स्वतंत्र झाल्यानंतरही देखील सुरक्षीत नसुन अनेक ठिकाणी महीलेसह मुलीवर चिमुकल्यावर देखील अत्याचार केले जात आहेत या संदर्भात मात्र सरकारची व्यवस्था सुस्त असल्याचे दिसून येत आहे आम्हाला सरकारकडून काही नको मात्र आमच्या मुली बाळी सुरक्षीत राहाव्यात अशी आर्त हाकमधुन भावनीक इच्छा व्यक्त केली जात आहे.भारतीय राज्य घटनेमधील तरतुदीनुसार महिला पुरुष समानता,आणी प्रथम महिलेची सुरक्षा हे वाक्य केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहेत.परंतु महिलेसह मुलींसाठी आजच्या निर्दयी जगामध्ये कडक कायदा करुन अत्याचार करणाऱ्या नराधमांना केवळ फाशीची शिक्षा होणारा कायदा करणे गरजेचे आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.जो पर्यंत या कडक कायद्याची अंमलबजावणी होणार नाही तो पर्यंत मुलीव व चिमुकल्यावर होणारे असे अंगावर थरार आनणारे अत्याचार, अन्याय थांबणार नाहीत.करीता केंद्र सरकारने व राज्यसरकारने तात्काळ व तातडीने या अतीशय गंभीर विषयावर ठोस पाऊल उचलुन जगामध्ये महिलेसह मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत केवळ फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात यावी अशी भावनिक इच्छा देशातील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

देशात मुलीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत  सरकारने फाशीच्या शिक्षेची तरतूद करावी!                                                  
Previous Post Next Post