सातपुडा पर्वतात असलेल्या यावल तालुक्यातील आंबापाणी या आदिवासी दुर्गम भागातील वस्तीवर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघ जळगाव तसेच तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ यावल याच्या संयुक्त विद्यमाने आंबापाणी या दुर्गम भागातील आदिवासी वस्तीवर रविवार दि.१६ रोजी विधी सेवा शिबाराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायधिश पवन बनसोडे तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश रजनिकांत एस.जगताप होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे शुभ हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करुण पुजन करण्यात आले तदनंतर मान्यवरांनी उपस्थित ग्रामस्थांना कायदे विषयक मार्गदर्शन केले यात यावल वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.कवडीवाले यांनी वनजमिन कायदा बाबत आदिवासी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले तर यावल प.स.चे किशोर सपकाळे यांनी शबरी आवास योजनांसह शासनाच्या इतर योजनाबाबत मार्गदर्शन केले शबरी आवास योजनेंतर्गत लाभार्थींना १ लाख २० हजार अनुदान दिले जाते,क्रांती योजनेतुन विहीर अनुदानासाठीही निधी दिला जातो मनरेगा अंतर्गत रोजगाराचीही हमी दिली जाते असे सांगीतले तसेच ॲड.याकुब तडवी यांनी आपल्या आदिवासी बोली भाषेतच उपस्थित आदिवासी बांधवांना शासनाच्या विविध योजनांबाबत संबोधित केले.यावेळी त्यांनी सातपुड्याच्या अती दुर्गम भागातील आदिवासी आपल्या पोटापाण्यासाठी जिवन जगत असतात त्यामुळे वनविभागाकडुन सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली तर आदिवासी बांधवांनी ही कोणतेही गैरकाम न करता वनविभागाला सहकार्य करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायाधीश आर.एस.जगताप यांनीही सातपुड्याच्या अशा दुर्गम भागात आयोजित केलेल्या या विधी सेवा शिबिरासाठी जातांना खडतर प्रवास करावा लागतो अशा रस्त्यावरून वनविभागाचे वाहनातुन कार्यक्रमाचे ठिकाण गाठले.यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांच्या रोजचा होणारा हा त्रास सहन करावा लागतो याबाबत आदिवासी बांधवाविषयी आपुलकी स्वरूपात आश्चर्य व्यक्त केले.व या वस्तीवरील आदिवासी बांधवांना रोजचा हा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी या आदिवासी बांधवांना रस्ता,वीज व पाणी अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण यांच्या कडुन शासनापर्यंत पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन दिले.मुलीचे वय १८ व मुलांनाचे वय २१ वर्षे झाल्यानंतरच लग्न करावे,आधार कार्ड बनवणे जन्म-मृत्यू विवाह यांच्या नोंदी ठेवावी,आपल्या मुलांना सुशिक्षित बनवावे यासाठी ग्रामस्थांना जनजागृती केली कार्यक्रमास्थळी येण्यासाठी जी कसरत करावी लागली ती आपण दररोज अनुभवत आहात याबाबत ही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायधिश पवन बनसोडे यांनीही उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा वकील संघाचे सचिव पवन बनसोडे यावल न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायधिश आर एस.जगताप तालुका वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.कवडीवाले यावल पोलीस उपनिरीक्षक अजयकुमार वाळवे वनविभागाचे आर.एफ.ओ बी.के. थोरात वनपाल विपुल पाटील यावल प. स.चे किशोर सपकाळे सरपंच भारसिंग बारेला विधिज्ञ याकुब तडवी,विधिज्ञ के.डी.सोनवणे,रियाज पटेल,भूषण महाजन,शेखर तडवी,अतुल भास्कर, नितीन कोळी (भुसावळ वकील संघ),पीएलएसए ठाकरे,संतोष तायडे,अशोक राठोड,पो हे.काॅ. किशोर परदेशी,संदिप सुर्यवंशी,होमगार्ड संजय साळुंखे इ.सह आंबापाणीसह सातपुड्याच्या कुशीतील जवळच्या आदिवासी वस्तीवरील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड.वारुळकर यांनी केले तर आभार ॲड.याकुब तडवी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाघझिरा वनपाल विपुल पाटील व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0