29 ऑगस्टला गर्दीचा अंदाज लागनं शक्य नाही- जरांगे
गोदाकाठच्या 123 गावच्या मराठा सेवकांची आंतरवालीत बैठक; आंदोलनाच्या पूर्वतयारीला सुरूवात
(बीड/प्रशांत बाफना: विभागीय संपादक)
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील शनिवार (दि.29) पासून आंतरवाली सराटी येथे उपोषणास बसत आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशरा दिला आहे. शनिवार (दि.29 ऑगस्ट)आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर आज जरांगे पाटील यांनी गोदाकाठच्या 123 गावांतील प्रमुख मराठा सेवकांची बैठक बोलावली होती. आंदोलनासाठी येणार्या समाजबांधवांसाठी सुविधा, निवास, जेवनावळीसह आरोग्य, स्वच्छता,पाणयासह गाड्यांसाठी पार्किंग नियोजनावर चर्चा करण्यात आली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज गोदाकाठच्या 123 गावच्या प्रमुख मराठा सेवकांची आंतरवाली सराटी येथे बैठक बोलावली होती. शनिवार (दि.29) पासून सुरू होणार्या आंदोलनाच्या नियोजनावर विषेश चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीमध्ये जरांगे पाटील यांनी मराठा सेवकांपासून आंदोलनासाठी येणार्या समाज बांधवांच्या सुविधापर्यंत सांगोपांग चर्चा केली. राज्यातला मराठा ताकदीने एकवल्यामुळे 29 तारखेच्या गर्दी बाबत अंदाज येत नसल्याचं म्हणत जरांगे यांनी केवळ गोदापट्ट्यातील गावांचे 125 लाख सेवक असून राज्यातील सेवकांचीही आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून सेवा लाभणार आहे.
समाज बांधवांची गाडी पार्किंग पासून निवास, जेवनावळी, पाणी, आरोग्य, स्वच्छता आदी सुविधांसाठी नियोजन करण्यात आलं आहे. अतिदक्षेसाठी डॉक्टरांची टीम सज्ज आहे. सुरुवातील 40 रुग्णवाहिका सज्ज आहेत गरज भासल्यास 500 रुग्णवाहिकांची तयारी ठेवली आहे. आंतरवाली सराटीच्या आवतीभोवती पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. समाजबांधवांसाठी आंदोलनस्थळावर वॉटरप्रुफ मंडपसह सुविधांचे नियोजन करण्यता आल्याचंही जरांगे म्हणाले.
मराठा आरक्षणाचा हा निर्णायक लढा आहे,त्यामुळे सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आता माघार नाही. तुम्ही फक्त भावनीक होवू नका, आंदोलन सुरू असताना पाणी, सलाईन घ्या असा हट्ट धरू नका. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. आंदोलनाच्या पहिल्या दिवसांपासून समाज बांधव आंतरवाली सराटीकडे येणार आहे. दि. 29 पासून आंदोलनाच्या शेवटपर्यंत समाज बांधव ताकदीने आंतरवाली सराटीच्याकडे येणार असल्याने त्यांना कुठल्याच सुविधांची कमतरता भासू नये याचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील मराठा बांधव या निमित्ताने एकत्र आला आहे, एकत्र आलेल्या समाजाच्या सेवेचं भाग्य आमच्या गोदापट्ट्यातील 123 गावांना लाभणार आहे. 29 तारखेला गाडी घरी ठेवून नका, सरकसट मराठा बांधवांनी आंतरवाली सराटीला येण्याचं अवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले.

