यावल बस स्थानकात नगराध्यक्षांचा अपमान केल्याचा शिवसेना उबाठा कडून निषेध
जळगाव प्रतिनिधी
दि.२३
जिल्ह्यातील या
येथील बसस्थानकात बसेसच्या लोकापर्ण सोहळयात नगराध्यक्ष छायाताई पाटील यांचा जाणीवपुर्वक शिष्टाचार डावलून अपमान करण्यात आला. हा घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून यावल शहरातील सर्व नागरिकांचा अपमान आहे. तेव्हा शिवसेना उबाठा कडून तातळीची बैठक बोलावून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. तसेच प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
येथील बसस्थानकात रविवारी राजमाता जिजाऊ बसेसचा लोकापर्ण कार्यक्रम होता या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक इम्रान पठाण यांनी नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांना मोबाईलवर संपर्क करीत आमंत्रण दिले होते व सदर कार्यक्रम हा आगाराचा होता या कार्यक्रमात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हेतु पुरस्कर प्रोटोकॉलचे उल्लंघन करीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पाटील यांचा अपमान केला व घडलेल्या प्रकारा नंतर त्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला तेव्हा या घटनेच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख शरद कोळी यांनी तातळीची बैठक बोलावली व या घटनेचा उबाठा कडून निषेध करण्यात आला. कार्यक्रम शहरात होता व सद्या तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणुन आमदार व त्यांच्या नंतर नगराध्यक्ष आहे तेव्हा हा घडलेला प्रकार हा केवळ एका व्यक्तीचा अवमान नसून यावल शहरातील सर्व नागरिकांचा अपमान आहे म्हणुन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली असुन यापुढे यावल शहरातील कोणत्याही शासकीय कार्यालयात आयोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षांचा योग्य सन्मान व शासकीय प्रोटोकॉल पाळलाच गेला पाहिजे.प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्या संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शिवसेना स्टाईलने सडेतोड उत्तर देण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यावी असे तालुका प्रमुख शरद कोळी यांनी सांगीतले या प्रसंगी संतोष खर्चे, पप्पु जोशी, जगदिश कवडीवाले, निलेश बारी, नगरसेविका वैशाली बारी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, कडू पाटील सह मोठ्या संख्येत उबाठाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
कॉग्रेस,उबाठा नगरसेवकांकडून निषेध.
सदर घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष छायाताई पाटील यांच्या कार्यालयात नगर पालिकेचे कॉग्रेसव उबाठा सह अपक्ष नगरसेवकांनी एकत्र येत घटनेचा निषेध केला या वेळी नगरसेवक पराग सराफ, निसार मोमीन, इमाम रजा खान, उपनगराध्यक्ष सईदाबी मो. याकुब, नगरसेविका रूबीनाबी कच्छी,शालुबाई भालेराव, शिला सोनवणे, कमरूनिस्साबी सैफुद्यीन, समीर खान, उमर कच्छी,कॉग्रेस शहराध्यक्ष मो. हकीम मो. याकुब सह आदींची उपस्थिती होती.-पुर्ण-

