ऐनपूर येथे ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस काढण्यात आला.

ऐनपूर  येथे ईद-ए-मिलादुन्नबी जुलूस काढण्यात आला.

ऐनपुर प्रतिनिधी सलमान खान/ 

रावेर तालुक्यातील ऐनपूर गावात पैगंबर हजरत मोहम्मद  यांच्या जन्मदिनानिमित्त ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आला.  यानिमित्त पंच कमिटीच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला.

जुलूसमध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. गावातील प्रमुख मार्गांवरून जुलूस शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. यावेळी सत्कार समारंभाचेही आयोजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने गावात एकता, बंधुभाव आणि शांततेचा संदेश देण्यात आला.
Previous Post Next Post