*पोलीस स्टेशन उरळ यांची धडाकेबाज कारवाई फसवणुकीच्या गुन्हयातील दोन आरोपी यांना अटक*
( मीडिया पोलिस टाईम अकोला जिला संपादक इमरान खान)
अकोला:पोस्टे उरळ येथे दि. 15/08/206 रोजी फिर्यादी नामे भाउसाहेब मच्छिद्र बनसोडे वय 35 वर्ष व्यवसाय मजुरी जात माळी रा. अखानी पोस्ट खेड ता. कर्जत जि. अहिल्यानगर यांनी दिलेल्या रिपोर्टवरुन अप.नं.298/2026 कलम 318(4), 3 (5) भा.न्या.सं.प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयातील फिर्यादी याचेसोबत महिला आरोपी नामे शिल्पा मिलींद अहिर वय वय 30 वर्षे रा. तारफेल जि. अकोला हिने बनावट लग्न करुन सदर महिला आरोपी व तिचे साथीदार आरोपी यांनी फिर्यादीकडुन 4,00,000/-रुपये घेवुन फसवणुक केली होती. सदर गुन्हयातील महिला आरोपी हिला दि.21/04/2026 रोजी तसेच तिचा साथीदार आरोपी नामे विनायक किसनराव गवई वय 56 वर्षे रा. ग्राम खांबोरा ता.जि. अकोला यांना दि.22/08/2026 रोजी उरळ पोलीस स्टेशनचे पोलीसांनी अटक केली असुन गुन्हयाचा तपास सुरु आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. अचिंत चांडक साहेब, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री.बी. चंद्रकांत रेडडी साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. गजानन पडघन साहेब यांचे मार्गदर्शनात उरळ ठाणेदार सपोनि जनार्धन खंडेराव, पोउपनि परमेश्वर केंद्रे, सफौ राजु जोंधरकर ब.नं. 557, पोहवा विजय चव्हाण ब.नं. 126, रघुनाथ नेमाडे ब.नं. 2079, पोकों विकास राठोड ब.नं 2235, पोकॉ उमेश वाकोडे ब.न. 1262 मापोकों रुक्मीण घोडके ब.नं. 1012 मपोकॉ पल्लवी काळे ब.नं. 2221 सर्व पोलीस स्टेशन उरळ यांनी केली.

