राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कूल मध्ये चालक दिन उत्साहात साजरा..

राहुरी फॅक्टरी येथील डी पॉल स्कूल मध्ये चालक दिन उत्साहात साजरा..

(राहुरी तालुका प्रतिनिधी ( प्रविण पाळंदे )

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील डिपॉल स्कूल मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर यांच्यावतीने चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक राहुल महाजन तसेच मोटार वाहन निरीक्षक निकिता पानसरे यांच्या वतीने डी पॉल स्कूल मधील बस चालकांचा सन्मान करण्यात आला .
यावेळी बसचालकांना मार्गदर्शन करताना राहुल महाजन म्हणाले की विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत आणणे आणि त्यांना घरी सुखरूप पोहोचविणे ही बस चालकाची महत्त्वाची जबाबदारी असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने चालकांनी वाहतूक नियमाचे पालन करावे तसेच वाहन चालविताना आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले चालक दिनाच्या निमित्ताने चालकांच्या जबाबदारीची जाणीव करून देतानाच त्यांच्या कामाबद्दल कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली यावेळी डिपॉल स्कूल बसचे सर्व चालक उपस्थित होते शेवटी सर्वांचे आभार श्री .सागर पाळंदे यांनी मानले .
Previous Post Next Post