*अकोल्यात 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत खदान पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर धाड, २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त*

*अकोल्यात 'ऑपरेशन प्रहार' अंतर्गत खदान पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यावर धाड, २७.६२ लाखांचा मुद्देमाल जप्त*

( मीडिया पोलिस टाईम जिल्हा विभागीय संपादक इमरान खान) 

अकोला, १७ सप्टेंबर:अकोला पोलिसांच्या 'ऑपरेशन प्रहार' या विशेष मोहिमेअंतर्गत खदान पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी धडक कारवाई केली आहे. खदान पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या येवता रोड, मलकापूर येथील क्लासमेट हॉटेल व बार येथे सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून २७,६२,८१०/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ आरोपींना अटक केली असून ६ आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून ९ वाहने, ८ मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.गोपनीय माहितीवरून खदान पोलिसांची धडक कारवाईखदान पोलिसांना त्यांच्या हद्दीतील क्लासमेट हॉटेल व बारमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध जुगार सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून हॉटेलवर अचानक धाड टाकली. पोलिसांना पाहताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:१. कुणाल सुनीलकुमार मनवानी (वय २६, रा. सिंधी कॅम्प, अकोला)२. कुशल विमलकुमार कावना (वय २१, धंदा- खाजगी नोकरी, रा. पक्की खोली, सिंधी कॅम्प)३. जतीन सुनीलकुमार मनवानी (वय १९, धंदा- शिक्षण, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प)४. दीपक परमानंद सिदारा (वय ४१, धंदा- व्यापार, रा. आदर्श कॉलनी, अकोला)५. निशांत मेघराज बजाज (वय २४, धंदा- व्यापार, रा. आदर्श कॉलनी, अकोला)६. राहुल दौलत चौथानी (वय २५, धंदा- मोबाईल शॉपी, रा. पक्की खोली, सिंधी कॅम्प)७. आशिष चंदुलाल जसवानी (वय २८, धंदा- व्यापार, रा. कच्ची खोली, सिंधी कॅम्प)८. रोशन अनिलकुमार राजपाल (वय २४, धंदा- कोल्ड्रींक दुकान, रा. पक्की खोली, सिंधी कॅम्प)९. वंश महेशकुमार टकरानी (वय १७ वर्षे ६ महिने, धंदा- व्यापार, रा. नानकनगर, निमवाडी, सिंधी कॅम्प)फरार आरोपींचा शोध सुरू:पोलीस छाप्यादरम्यान सुमीत गुरबानी, पवन चेनानी, कौशीक प्रकाश शोधनानी, अमित बालचंदानी, जितेंद्र कमलकुमार खबरानी आणि विजय अहुजा (सर्व रा. सिंधी कॅम्प, अकोला) हे पोलीस पथकाला चकमा देऊन फरार झाले. पोलीस सध्या या सर्व फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसदरची धडक कारवाई अकोल्याचे पोलीस अधीक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी, आणि शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईचे नेतृत्व खदान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी केले. तसेच या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक (PSI) दीपक पवित्रकार, पोलीस हेकॉ (पोहेकॉ) निलेश खंडारे, भूषण मोरे, गिरीष विर, प्रवीण डोंगरे, अभिमन्यु सदांशिव आणि पोलीस कॉन्स्टेबल (पोकॉ) शिवम दुबे, मंगेश खेडकर, वैभव कस्तुरे व आकाश कठाने यांचा समावेश होता.
Previous Post Next Post