*आदिवासी एकता मंच च्या उपोषणाच्या मागण्या मान्य झाल्याने व कारवाई समाधानकारक झाल्याने उपोषण स्थगित*

*आदिवासी एकता मंच चे उपोषण मागण्या मान्य झाल्याने व कारवाई समाधानकारक झाल्याने उपोषण स्थगित*
    
(मुख्य कार्यकारी संपादक जाकीर तडवी कुसुंबा)

*आदिवासी एकता मंच चे पदाधिकारी दिनांक 15 पासून उपोषणास बसले होते मात्र प्रशासनाकडून समाधानकारक तोडगा निघत नसल्याने आज तिसऱ्या दिवसापर्यंत संघर्ष नेला आज प्रकल्प अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा करून वर्धमान हे गाव पेसा मध्ये आणण्यासाठी व आवश्यक डॉक्युमेंट शोधण्यासाठी समिती स्थापन केली त्या समितीमध्ये संघटनेचे पदाधिकारी तहसील चोपडा यांचे अधिकारी चोपडा बी डी ओ संघटनेचे दोन पदाधिकारी व गावातील दोन पदाधिकारी यांची समिती स्थापन झाली ही समिती 17.9.26 ते 28 .9.26 तारखेपर्यंत डॉक्युमेंट शोधून तसा अहवाल देईल व त्यानंतर तहसीलदार व प्रांत यांच्यासोबत1.10.26.ते 6.10 26 या कालावधीत बैठक होईल तसेच दिनांक 7.10.16 ते 10.10 26 या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक होईल व त्याचा अहवाल टीआरटीआयला दिला जाईल व टीआरटी आय यांच्या मार्फत निजाम कालीन ब्रिटिश कालीन डॉक्युमेंट गोळा केला जातील असे ठोस ठरवण्यात आले*
*प्रकल्प कार्यालयामार्फत दिलेले गेलेल्या पेसा दाखल्यां मध्ये बोगस दाखले दिले असल्या बाबत चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली त्यामध्ये* 
*समिती प्रमुख प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास निरीक्षक, संघटनेचे दोन प्रतिनिधी प्रतिनिधी श्री रब्बील तडवी युनुस तडवी, फक्त तडवी समावेश करून ही समिती बोगस दाखल यांची चौकशी करेल व त्याचा अहवाल संघटनेला सुद्धा दिला जाईल व सिद्ध झाल्यास गुन्हे दाखल केले जातील*
*ह्या प्रमुख मागण्यांसह इतर सर्व मागण्या मान्य झाल्या असल्याचे लेखी पत्र प्रकल्प अधिकारी यांनी आंदोलन कर्त्यांना दिले*
*त्यानंतर प्रकल्प अधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन लेखी आश्वासन घेऊन गेल्या तीन दिवसापासून चालत असलेले उपोषण काही काळाकरता स्थगित करण्यात आले असून मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे*
*याप्रसंगी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्या हस्ते उपोषण करताना शरबत देऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी राज्याध्यक्ष एम बी तडवी राज्य सदस्य जहांगीर तडवी जिल्हा अध्यक्ष मेहरबान तडवी जिल्हा संघटक रब्बील तडवी जिल्हा सचिव फक्त तडवी जिल्हा सहसचिव जुम्मा तडवी यावल तालुका अध्यक्ष युसुफ तडवी जिल्हा सदस्य अमित तडवी यावल शहर प्रमुख शाहरुख तडवी महिला जिल्हाध्यक्ष मुन्ना ताई तळवी महिला जिल्हा उपाध्यक्ष रेहाना ताई तडवी जिल्हा उपाध्यक्ष संजय दादा तडवी तालुका सदस्य मेहरबान तडवी यावल तालुका उपाध्यक्ष फिरोज तडवी यावल तालुका उपाध्यक्ष याकूब तडवी तसेच वरगव्हाण येथील ग्रामस्थव आदिवासी थोडी विलकता मंचचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.*
          
Previous Post Next Post