दुष्काळाने शेतकरी होरपळत असताना लोकशाही बचाव’ आंदोलनाचा आव आणणे म्हणजे दुटप्पीपणाचा कळस- शंकर महाजन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष..
*शेतकरी संकटात, जनता त्रस्त; मग सत्ताधाऱ्यांचे लोकशाही बचाव आंदोलन नेमके कोणासाठी?
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत असताना, शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस उपाययोजना करणे, नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणे, तातडीने मदत मिळवून देणे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे ही सत्ताधाऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.
नांदेड जिल्ह्यात सत्ताधारी व मित्रपक्षांचे ९ आमदार, २ राज्यसभा खासदार आणि १ विधान परिषद आमदार असतानाही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यासाठी किती ठोस प्रयत्न झाले?
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेणे, नुकसानभरपाई, पीकविमा, पाणीटंचाई आणि आर्थिक मदतीसाठी सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करणे, ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी नाही का?शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू, तरी सत्ताधाऱ्यांच्या ओठांवर घोषणा,
बळीराजा संकटात असताना, कसली ही लोकशाही वाचवण्याची योजना?आधी शेतकऱ्यांच्या वेदना समजा, त्यांच्या जखमांवर मलम लावा,
मग लोकशाही बचावाच्या घोषणा द्या, आधी बळीराजा वाचवा
शेतकरी संकटात असताना त्याच्या मदतीसाठी मैदानात न उतरता, केवळ राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी ‘लोकशाही बचाव’ आंदोलन करणे हा दुटप्पीपणा नाही का?
लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्यांनी आधी शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या जगण्याचा अधिकार वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा!लोकशाही म्हणजे केवळ आंदोलने, भाषणे आणि राजकीय घोषणाबाजी नव्हे; तर संकटात सापडलेल्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे होय.
सत्ता तुमची, सरकार तुमचे, आमदार-खासदारही तुमचे,
मग संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे वाली कोण
नुसत्या भाषणांनी ना पोट भरतं, ना शेतकऱ्याचं संकट सरतं,
मदतीचा हात पुढे केला तरच जनतेचा विश्वास टिकतो
वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे की, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे, दुष्काळग्रस्त भागात प्रभावी उपाययोजना झाल्या पाहिजेत आणि लोकप्रतिनिधींनी जनतेप्रती असलेली जबाबदारी पार पाडली पाहिजे.आधी शेतकरी वाचवा, मग लोकशाही वाचवण्याच्या घोषणा द्याघोषणाबाजी नको, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत हवीसत्तेचा वापर जनतेच्या सेवेसाठी करा, राजकीय दिखाव्यासाठी नाही!शेतकऱ्यांच्या घामाची किंमत ओळखा; अन्यथा जनता योग्य वेळी जाब विचारल्याशिवाय राहणार नाही शंकर महाजन
जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
नांदेड दक्षिण
वंचित बहुजन आघाडी नांदेड मराठवाडा दुष्काळग्रस्त शेतकरी नांदेड

