*कात्रज घाट बचाव पदयात्रा - हजारों पुणेकर एकत्र!*कात्रज घाट स्वच्छता व संवर्धन मोहीम

*कात्रज घाट बचाव पदयात्रा - हजारों पुणेकर एकत्र!*

कात्रज घाट स्वच्छता व संवर्धन मोहीम

*पुणे:* आज कात्रज चौक ते कात्रज घाट (4 KM) दरम्यान ऐतिहासिक *मानवी साखळी पदयात्रा* पार पडली. *इन्कलाब जयते टीम, प्रमुख - विक्रांत सिंग* यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मोहिमेत *1000+ नागरिक, विद्यार्थी, युवा आणि ज्येष्ठ नागरिक* सहभागी झाले.

दोन रांगेत, शिस्तबद्ध पद्धतीने 4 किलोमीटर लांब मानवी साखळी बनवून सर्वजण कात्रज जंगलातील त्या ठिकाणी पोहोचले जिथे *3000+ झाडे तोडली गेली आहेत.* तिथे आमच्या *7 प्रमुख मागण्यांचे* निवेदन ठेवण्यात आले आणि देश व निसर्ग वाचवण्यासाठी सर्वांच्या योगदानावर व्याख्यान झाले.

*या ऐतिहासिक यात्रेत सहभागी संस्था:*

1. भारतीय विद्यापीठ व्यापारी असोसिएशन अध्यक्ष व शिवसेना पुणे उप शहर प्रमुख श्री.पंढरीनाथ खोपडे 
2. VIT कॉलेजचे विद्यार्थी
3. एकता योगा ट्रस्ट ( ज्येष्ठ नागरिक समूह ) श्री.नानासाहेब निवंगुणे 
4. जय जवान करिअर अकॅडमीचे विद्यार्थी
5. रयत महाराष्ट्र कामगार संघटना
6. पुण्याच्या विविध भागातील जागरूक नागरिक
7. छावा कॅब संघटना अध्यक्ष श्री.संतोष भुरूक

*आमच्या 7 मागण्या:* 
1) राखीव वन घोषित करा
2) 5 फूट भिंत + 5 फूट फेन्सिंग
3) 7 ठिकाणी CCTV
4) नागरिक समिती
5) 3000+ झाडे तोडीची चौकशी
6) PWD रस्ता PMC कडे हस्तांतरण
7) हेरिटेज झाडांचे संवर्धन.

*आम्ही आभारी आहोत:*
या यशस्वी कार्यक्रमासाठी *अरुंधती फाउंडेशनचे आदित्य गुप्ते* (सर्वांसाठी नाश्त्याची व्यवस्था)
*आदित्य व सतीश शिंदे* (पाण्याची व्यवस्था) आणि
*श्री.पंढरीनाथ खोपडे* ( साउंड व्यवस्था ) यांचे विशेष आभार.

ही फक्त सुरुवात आहे, कात्रज घाट वाचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही.
*🇮🇳जय हिंद 🚩जय 🔥 महाराष्ट्र 🐅*
Previous Post Next Post