(जळगाव जिल्हा प्रतिनिधी) जिल्ह्यातील जळगाव शहरात अनेक ठिकाणी दारुचे अड्डे राजरोसपणे सुरू असून शहरात काही ठिकाणी जसे जून्या बस स्थानका च्या मागे असलेल्या वाईन शोप जवळ बेवळे हे विनाकारण सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण दारुच्या नशेत त्रास देत असताना दिसत आहे.हेच चित्र आता हवे सारखे पसरतांना सध्या तरी पहावयास मिळत आहे.हा प्रकार कुठपर्यंत चालणार?असा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि जिल्ह्यातील जनतेकडून बोलले जात आहे की कोण लावणार बेवळ्यान्ना लगाम. याकडे मात्र जिल्ह्यातील जनतेचे लक्ष वेधून आहे. जिल्हा चे ठिकाण असल्याने वेगवेगळ्या तालुक्यातील नागरिक हे शासकीय कामानिमित्त जळगाव ला ये जा करीत असतात.. त्यातच कामात व्यस्त असलेल्या काही नागरिकांना ह्या बेवळ्यानचा चा सामना करावा लागतो.आणि हे बेवळे जास्त करुन बस स्थानक जवळील होटेल वगैरे या ठिकाणी दांगोडे करतांना नजरेस पडत आहे. तरी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांनी या बेवळ्यानचा तात्काळ बंदोबस्त करून, कडक दंडात्मक कारवाई करावी. अशी जळगाव जिल्ह्यातील जनतेसह महिलांची पोलीस प्रशासनाकडे रास्त स्वरुपाची मागणी आहे..