रावेर येथे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या संघर्ष कन्या शुभांगी ताई पाटील (सूर्यवंशी) यांची शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी रावेर तालुका प्रतिनिधी (परमानंद शेलोडे) रावेर तालुक्यात रावेर येथे नुकत्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना उपनेत्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार स्वतः शिक्षक असून शिक्षकांच्या जवळून समस्या सोडवणाऱ्या व शिक्षकांसाठी काम करणाऱ्या शिक्षकां साठी संघर्ष कन्या म्हणून ओळखणाऱ्या शुभांगी ताई पाटील( सूर्यवंशी) यांनी शिक्षक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना विश्वास देऊन सांगितले की येत्या 2024 निवडणुकीला मी शिवसेना उबाठा गटाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवीत आहे तरी मला आपले अमूल्य मत द्यावे अशी त्यांनी शिक्षक मतदारांना आपली आग्रही मागणी केली यावेळी शिक्षक मतदारांनी त्यांना मतदान करण्याचे आश्वासन दिले यावेळी शिक्षक मतदार व त्यांचे सहकारी उपस्थित होते...!

Previous Post Next Post