अध्यात्मिक वातावरण ठेवण्यात कीर्तनकारांचा मोठा वाटा - गिरमकर परिवारस्वरूप गिरमकर. ग्रामीण प्रतिनिधी शिरूर शिरूर : थोरामोठ्यांचा सत्कार करण्याचं भाग्य आज आम्हाला मिळाले तसेच हरिपाठाचे चार शब्द ऐकायला मिळाले. आध्यात्मिक वातावरण ठेवण्यात प्रवचनकार आणि किर्तनकारांचा मोठा वाटा आहे,' असे गिरमकर परिवाराने उरळगाव ग्रामस्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात म्हणाले. दिनांक २४ ते ३१ मे या कालावधीत भव्य अखंड हरिनाम सप्ताह उरळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे . सोमवार दि. २७ मे रोजी गिरमकर परिवारातफे महाप्रसाद व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते याचा हजारो भाविक भक्तांनी आस्वाद घेतला.ह.भ.प. विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांची सुश्राव्य अशी कीर्तन सेवा गिरमकर परिवाराने दिली. सर्व भाविक भक्त महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले.यावेळी महाराजांचा सत्कार गुलाब पाकळ्यांची उधळण करत व शाल,श्रीफळ व हार घालून गिरमकर परिवारातर्फे करण्यात आला. दरवर्षी हा सप्ताह आयोजित करण्यात नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे उरळगाव ग्रामस्थांनी सांगितले.
byMEDIA POLICE TIME
-
0