केळी उत्पादक संघाच्या वतीने 31 मे ला केळी परिषदेचे कंदर येथे आयोजनरितेश टीलावत जिल्हा प्रतिनिधी अकोला केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यातील तमाम केळी उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दिनांक 31 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू सांस्कृतिक भवन कंदर ता. करमाळा या ठिकाणी केळी परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकऱ्यांचे कैवारी अभ्यासू नेते किरण भाऊ चव्हाण यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. पुढे बोलताना किरण भाऊ चव्हाण म्हणाले, या केळी परिषदेत राज्यातील केळी शेतीचे वास्तव चित्र सर्वांच्या नजरेसमोर येणार असून केळीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आजची परिस्थिती बरीचशी नाजूक झाली असून अवकाळी पाऊस, गारा, वाढते तापमान, सी एम वी व्हायरस, बोगस औषधे, माती मिश्रित निंबोळी पेंड, विमा कंपन्यांची मजुरी आणि व्यापाऱ्यांनी चालवलेली शेतकऱ्यांची पिळवणूक अशा अनेक कारणामुळे केळी उत्पादक शेतकरी खचला आहे.जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय व तालुका कृषी विभागामार्फत केले जाणारे मोलाचे मार्ग दर्शन ग्रामीण भागात केले जावे. ते जिल्ह्याच्या ठिकाणी करू नये. तसेच केळीलाहमीभाव मिळावा अशा विविध मागण्यांसाठी व विविध समस्यांवर ठोस उपाययोजना करण्यासाठी केळी क्षेत्रातील विचारवंत शास्त्रज्ञ उद्योजक व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सध्या परिस्थितीवर चर्चा करून त्याचे कारण शोधून ठोस उपाययोजना करण्याची व सुचवण्याची गरज निर्माण झाली आहे.कारण चर्चेतूनच अनेक मार्ग तयार होतअसतात.आणि तेच मार्ग शेतकऱ्यांना शोधून देण्या साठी या गरजेची पूर्तता करण्यासाठी हे उत्पादक शेतकरी संघाने राज्यस्तरीय दुसऱ्या केळी परिषदेचे खास आयोजन कमलादेवीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करमाळा तालुक्यातील कंदर या ठिकाणी करण्यात आले आहे.याव्यतिरिक्त निर्यातक्षम केळी उत्पादन, प्लांनटेशन ते हार्वेटिंग, याविषयी अतिशय बहुमोल असे मार्गदर्शन माननीय अझर पठाण करणार आहेत. तरी या सुवर्णसंधीचा लाभ राज्या तील तमाम केळी उत्पादक शेतकरी बांधवांनी घ्यावा आणि केळी परिषदेला उपस्थित राहावे असे आवाहन केळी उत्पादक शेतकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ चव्हाण यांच्यासह उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव पाटील, जिल्हा ध्यक्ष महेंद्र पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अभिजीत भांगे, जिल्हा उपाध्यक्ष सागर रणदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष एकनाथ कोरके कार्याध्यक्ष सचिन गंगथडे सचिव अतुल पाटील राज्य समन्वयक सचिन कोरडे तज्ञ संचालक पंढरीनाथ इंगळे नामदेव वलेकर संजय रोंगे प्रवक्ता राजेश नवाल करमाळा तालुका अध्यक्ष वैभव पौळ, माढा तालुकाध्यक्ष पंढरपूर तालुका माळशिरस तालुका अध्यक्ष नवनाथ जाधव आणि मोहोळ तालुका अध्यक्ष देवानंद गोडसे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष यांनी केले आहे.

Previous Post Next Post