उमटी येथे अचानक घर जळुन खाक सुरतान पावरातालुका प्रतिनिधी अक्राणीअक्कलकुवा तालुक्यातील उमटी पाटीलपाडा येथे घराला अचानक आग लागून घर जळुन खाक झाले. घरात बांधलेले गाय व वासरू,शेळी, कोंबड्या भाजल्याने वासरू आणि शेळी जळुन मूत्यु झाला. बांधलेली गाय ८० टक्के भाजली असुन गायींचे डोळ्यात आस लागली व जीवनावश्यक संसारोपयोगी वस्तू २१ हजार रुपये रोख जळाले मोठी हानी झाली यावेळी घरमालक मिलिंद गिंबा वळवी बाहेरगावी सुनिता मिलिंद वळवी ह्या आंबा कैरीचे आमचुल तयार करण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या. तिघे मुले बाहेर खेळत होते आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
byमीडीया पोलीस टाईम
-
0