प्राध्यापक रामचंद्र भरांडे सर यांचा जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड उपोषणाचा पाचवा दिवस शासनाने दखल घ्यावी अन्यथा मातंग समाज पूर्ण जिल्ह्यातून जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार.. ( मारोती एडकेवार सगरोळी सर्कल प्रतिनिधी सगरोळी) : लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक प्राध्यापक रामचंद्र भरांडे साहेब मातंग समाजाच्या विविध मागण्यासाठी एक जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपोषणाला बसलेले आहेत मातंग समाजाच्या अ ब क ड वर्गीकरणाच्या मागणीसाठी लहुजी साळवे अभ्यास आयोगाचे अंमलबजावणी करण्यात यावी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण करण्यात यावे दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे किती लाभधारकांना लाभ झाला याची चौकशी करण्यात यावी मातंग समाजाच्या शमशान भूमीचे प्रश्न ताबडतोब मार्गी लागावे या सर्व मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे उपोषण चालू आहेत तरी आज उपोषणाचा पाचवा दिवस असून सुद्धा प्रशासन दखल घेत नसल्याची नाराजी संघटनेचे कार्यकर्ते व तमाम मातंग समाज करत आहे सर्व जिल्ह्यातील मातंग समाजातील कार्यकर्ते व मातंग समाजातील अनेक महिला संघटना महिला आघाडी व तसेच लोकस्वराज आंदोलन संघटनेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी शासनाला विनंती करत आहेत की मागण्या मान्य करून लवकर उपोषण सोडवावे अन्यथा सर्व जिल्ह्यातून मातंग समाजा कलेक्टर ऑफिस मध्ये येऊन बसल्याशिवाय राहणार नाही किंवा जर आंदोलनातील त्रिव दिशेने जात असेल शहर जाम होत असेल तर याची जबाबदारी हे प्रशासनाची राहील दिनांक 4 जुलै रोजी पासून अनेक मातंग समाजातील जिल्ह्यातील कार्यकर्ते व लोकस्वराज आंदोलन संघटनेचे पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी हे लोकस्वराज आंदोलन प्राध्यापक रामचंद्र भरांडे साहेब यांच्या उपोषणाच्या ठिकाणी जाऊन त्यांना पाठिंबा देत आहेत तरी शासनाने त्यांचे मागण्या मान्य करून उपोषण सोडून मातंग समाजाला न्याय मिळवून द्यावा हीच विनंती तमाम सकल मातंग समाज करत आहे

Previous Post Next Post