अक्राणी तालुक्यातील सुरवाणी गावात सातपुडा बचाव अभियान अंतर्गत वृक्ष लागवड.... (सुरतान पावरा तालुका प्रतिनिधी अक्राणी )सातपुडा बच्छाव अभियान अंतर्गत निसर्ग सेनेने जिल्हा परिषद शाळा लहान सुरवाणी यांच्यासोबत लहान सुरवाणी येथे शाळेतील विद्यार्थी गावातील गावकरी शिक्षक वर्ग विद्यार्थी वृक्षारोपण करताना या वृक्षारोपण मोहिमेस रतन दादा पाडवी, जिल्हा परिषद सदस्य कात्री गट श्रीमती वंदना वळवी, शिक्षणाधिकारी प्राथमिक लोहकरे साहेब, उपशिक्षण अधिकारी ज्ञानेश्वर चित्ते, शिक्षण विस्ताराधिकारी अधिकारी रोहिदास पाडवी सरपंच तसेच जंगलसिंग पाडवी जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख करणसिंग वसावे, शंकर वसावे, रामचंद्र पटेल, दिनेश तडवी, शाळेचे मुख्याध्यापक व त्यांचा शिक्षक वर्ग आणि सातपुडा निसर्ग सेनेचे धीरसिंग वळवी, गोटु वळवी,विजयसिंग पराडके प्रा.एस.एस.पवार,प्रा. रवींद्र माळी,व सातपुडा निसर्ग सेनेचे संयोजक प्रा. डॉ खुमानसिंग वळवी वृक्षारोपण कार्यक्रम मोहिमेत उपस्थित होते या मोहिमेत विद्यार्थी व गावकरी यांच्या सहकार्याने जांभूळ, आवळा, आणि चिंच झाडे लावण्यात आली सातपुड्यातील गतवैभव आणि निसर्गाक समतोल प्राप्त करून देण्यासाठी तसेच सातपुड्याचे सौंदर्य व आरोग्य समाजही संस्कृती पुरक बनविण्यासाठी मोहिमेचा हा पहिला टप्पा लहान सुरवाणी येथुन सुरू करण्यात आला.या मोहिमेत सुरुवात करताना सातपुडा निसर्ग संयोजक प्रा.खुमानसिंग वळवी यांनी विद्यार्थ्यांची झाडांची आवश्यकता व त्यांचे संवर्धन कशा पद्धतीने करायचे यासंबंधी संवाद साधला सातपुडा निसर्ग सेनाने धडगांव तालुका कृषी अधिकारी रमेश पाडवी यांचे झाडाचे रोपटे उपलब्ध दिल्यामुळे विशेष आभार व्यक्त केले.
byMEDIA POLICE TIME
-
0