पियूच्या स्मृती दिनानिमित्ताने शैक्षणिक साहित्याचे वाटप, परीवर्धा विद्यालयात कार्यक्रम... (नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : परिवर्धा, ता. शहादा येथील गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालयात प्रियंका चॅरिटेबल ट्रस्ट, शहादा तर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. शहाद्यातील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. प्रदीपकुमार पटेल याची कन्या स्वर्गीय पियू प्रदीपकुमार पटेल हिच्या ३२व्या स्मृती दिनानिमित्त इयत्ता पाचवी व सहावीच्या विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष उद्धव पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून पियूच्या मातोश्री सौ. रिताबेन पटेल उपस्थित होत्या. तसेच माधुरी खैरनार, शितल राठोड, भावना पाटील, गायत्री वानखेडे, शोभा पाटील, सुनिता पाटील, किरण पाटील, वडछील येथील माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पद्मा पाटील, ज्येष्ठ शिक्षक के. एन. पाटील, सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा भारती भट आदी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जगदीश पाटील यांनी केले. यावेळी प्रियांका चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत केलेल्या कार्याबद्दल रिताबेन प्रदीपकुमार पटेल व त्यांच्या परिवाराचे आभार मानले. याप्रसंगी शितल राठोड यांनी आपल्या मनोगतातून स्वर्गीय पियू हिच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाच्या समारोप सर्व मान्यवरांच्या हस्ते रानफुले या पाक्षिकाच्या उद्घाटनाने व वृक्षारोपणाने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका रत्ना पाटील मॅडम यांनी केले. तर कलाशिक्षक एस.आर. मंगळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
byMEDIA POLICE TIME
-
0