रेशन धान्य दुकानदार आणि पुरवठा अधिकारी यांनी संगनमताने अंत्योदय कार्ड बेकायदा रद्द केल्याचे उघड. (यावल दि.३१ ( सुरेश पाटील विभागीय संपादक )यावल येथील एक स्वस्त धान्य दुकानदार दर महिन्याला धान्य कमी देत असल्याची तक्रार एका ग्राहकाने केली म्हणून संबंधित रेशन दुकानदार आणि यावल पुरवठा अधिकारी यांनी संगनमत करून ग्राहकाला धडा शिकवण्याच्या कारणातून त्याचे रेशन कार्डच रद्द केल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या दालनात उघड झाल्याने त्या ग्राहकात आणि तक्रार करणाऱ्यांमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून बेकायदा कारवाई करणाऱ्या विरुद्ध आता काय कारवाई होणार..? याकडे लक्ष वेधून आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस यावल तालुका अध्यक्ष ( अजित पवार गट ) आकाश सतीश चोपडे यांनी दि.३० जुलै २०२४जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय जळगाव येथे प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता उपजिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या यांच्याकडे यावल येथील पुरवठा अधिकारी अंकिता वाघमळे यांनी लाभार्थी यांची नावे सॉफ्टवेअर मधून यावल येथील योगेश नारायण पाटील यांचे कुठल्या नियमाद्वारे व कुठल्या तांत्रिक अडचणी द्वारे अंत्योदय कार्डचे नाव कमी केले याबाबत कुठलीही माहिती न दिल्यामुळे आम्ही माननीय रुपेश बिजेवार डी एस ओ यांच्याकडे याबाबत तक्रार दाखल केली असता त्यांनी त्याच क्षणी यावल पुरवठा विभागातील अंकिता वाघमारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की स्वस्त दुकानदार याच्या सांगण्यावरून लाभार्थी योगेश नारायण पाटील यांचे नाव कमी केले होते तरी पुरवठा अधिकारी यांच्या लक्षात यावल पुरवठा विभागाचे बेकायदा कृत्य लक्षात आले, त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे काल दिनांक ३० जुलै २०२४ रोजी लेखी निवेदन दिले व त्यात पुरवठा अधिकारी अंकिता वाघमारे यांच्यावर कारवाई करण्यात यावी व यावल येथील रेशन दुकान नंबर ११० खान्देश महिला विकास संस्था जळगाव अकीला मेहमूद पटेल यांचे वर तात्काळ कारवाई करून दुकान निलंबित करण्यात यावे तसेच यापूर्वी सर्वपक्षीयांकडून निवेदन तक्रार देण्यात आलेली आहेच तरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ७ दिवसाच्या आत तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तरी यावेळी तालुकाध्यक्ष आकाश सतीश चोपडे, उपजिल्हाध्यक्ष जुगल श्रीनिवास पाटील,शहराध्यक्ष योगेश नारायण पाटील इत्यादी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post